महेंद्र सिंग धोनी याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्स संघाने सोमवारी (दि. 29 मे) पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी उंचावली. महत्त्वाच्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स संघाला अखेरच्या चेंडूवर पराभवाचा धक्का देत चेन्नईने दाखवून दिले की, त्यांना ‘कमबॅक सुपर किंग्स’ का म्हटले जाते. हा सामना जिंकल्यानंतर कर्णधार एमएस धोनी याने त्याच्या निवृत्तीविषयी सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम लावला.
काय म्हणाला धोनी?
एमएस धोनी (MS Dhoni) याने स्पष्ट केले की, तो सध्या आयपीएलमधून निवृत्ती घेणार नाहीये. त्याने चेन्नई सुपर किंग्स संघाला पाचव्यांदा चॅम्पियन बनवल्यानंतर निवृत्तीच्या प्रश्नावर पूर्णविराम लावला. 5वा किताब पटकावल्यानंतर धोनी म्हणाला की, “माझ्यासाठी निवृत्ती घेणे सोपे होते, पण माझ्यासाठी हे कठीण आहे की, जे प्रेम आणि आपलेपण चाहत्यांनी मला दिले, ते पाहून मी म्हणू शकतो की, मी पुढील हंगाम खेळेल.”
The interaction you were waiting for ????
MS Dhoni has got everyone delighted with his response ???? #TATAIPL | #Final | #CSKvGT | @msdhoni pic.twitter.com/vEX5I88PGK
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2023
पुढे बोलताना धोनी म्हणाला की, “जर तुम्ही परिस्थिती पाहिली, तर हा माझ्या निवृत्तीची घोषणा करण्याचा सर्वात चांगला काळ आहे. हे सोपे नाहीये की, मी धन्यवाद म्हणेल आणि निवृत्त होईल. मात्र, माझ्यासाठी कठीण असेल की, मी मेहनत करेल आणि येणाऱ्या नऊ महिन्यांमध्ये आणखी एक आयपीएल हंगाम खेळण्याचा प्रयत्न करेल. शरीराने साथ द्यायला पाहिजे. मात्र, ज्याप्रकारचे प्रेम मला चेन्नई चाहत्यांकडून मिळाले, तेव्हा मी त्यांना आणखी एक हंगाम भेट म्हणून देऊ इच्छितो.”
“ज्याप्रकारचे प्रेम आणि भावना मला मिळाली, हे काही असे आहे, जे मला त्यांच्यासाठी करायचे आहे. हा माझ्या कारकीर्दीचा शेवटचा भाग आहे. मी हा हंगाम इथून सुरू केला आणि ते माझे नाव पुकारत होते. हा माझ्या कारकीर्दीचा भाग आहे. हेच चेन्नईमध्ये झाले. मात्र, चांगले होईल की, मी पुनरागमन करेल आणि जितके शक्य होईल, तितके खेळेल. प्रेक्षकांकडून मला खूप प्रेम मिळते. कारण, त्यांना वाटते की, ज्याप्रकारचे क्रिकेट मी खेळतो, ते तेदेखील खेळू शकतात. यामध्ये काही परंपरा नाहीये. मला सर्वकाही सामान्य ठेवायचे आहे.”
शेवटी धोनी असेही म्हणाला की, “मला स्वत:ला बदलायचं नाहीये. मी जसा आहे, मी तेच दाखवतो. आम्ही सुरुवातीच्या सामन्यात चांगली कामगिरी केली नाही, पण आमच्या फलंदाजी फळीने चांगली कामगिरी केली. कोण कशाप्रकारे दबाव पेलतो, हे आम्ही समजतो. जर रहाणेसारखा खेळाडू असेल, तर चांगले आहे. जिथपर्यंत रायुडूची गोष्ट आहे, तर तो स्वत:च नाही, तर आपण सर्वजण त्याची खेळी सदैव स्मरणात ठेवू. तो असा खेळाडू आहे, जो नेहमीच चांगले करू पाहतो आणि हा त्याचा दिवस होता.”
चेन्नईचा अखेरच्या चेंडूवर विजय
या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 4 विकेट्स गमावत 214 धावा केल्या होत्या. मात्र, पावसाच्या व्यत्ययामुळे हे आव्हान कमी झाले. चेन्नईला 15 षटकात 171 धावांचे आव्हान मिळाले होते. यावेळी चेन्नईला अखेरच्या षटकात विजयासाठी 13 धावांची आवश्यकता होती. अशात रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने अखेरच्या चेंडूवर विजयी चौकार मारत चेन्नईला डकवर्थ-लुईस नियमाने 5 विकेट्सने विजयी केले. यासह चेन्नईने पाचव्यांदा ट्रॉफीही नावावर केली. (skipper ms dhoni said i would be working hard for 9 months and try to play another ipl)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL ट्रॉफी हुकली, पण पुरस्कार पटकावण्यात टायटन्स आघाडीवर; वाचा कुणी-कुणी कोरलं पुरस्कारांवर नाव
ब्रेकिंग! CSK ने पाचव्यांदा जिंकली IPL ची ट्राॅफी, थरारक फायनलमध्ये गुजरातचा निसटता पराभव






