भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने पार पडले असून त्यात भारताने विजय मिळवला आहे. तिसरा कसोटी सामना 1 मार्चपासून इंदोरमध्ये खेळला जाणार आहे. मात्र, त्यापूर्वीच धक्कादायक बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा कर्णधार पॅट कमिन्स तिसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. कमिन्सची आई आजारी आहे आणि आईला भेटण्यासाठी तो ऑस्ट्रेलियाला गेला आहे. अशात तिसऱ्या कसोटीत तो सामील होऊ शकणार नाही.
पॅट कमिन्स (Pat Cummins) तिसऱ्या कसोटीतून बाहेर पडल्यामुळे आता ऑस्ट्रेलियाच्या चिंता वाढल्या आहेत. तिसऱ्या कसोटीत कमिन्सच्या जागी संघाचे नेतृत्व स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) करणार आहे. तिसऱ्या कसोटीपूर्वी कमिन्सला रविवारी (दि. 26 फेब्रुवारी) भारतात परतायचे होते. मात्र, त्याला काही काळ कुटुंबासोबत राहायचे आहे. कारण, त्याची आई खूपच आजारी आहे.
JUST IN: Pat Cummins will remain home for the third #INDvAUS Test in Indore after he this week returned to Sydney due to a family illness | @LouisDBCameron https://t.co/zlAXrSclc5 pic.twitter.com/COIpgKUpfD
— cricket.com.au (@cricketcomau) February 24, 2023
काय म्हणाला कमिन्स?
दिल्ली कसोटी तीन दिवसात संपल्यानंतर एकूण 9 दिवसाचा ब्रेक आहे. अशात अपेक्षा केली जात होती की, 29 वर्षीय कमिन्स बुधवारपासून (1 मार्च) सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी भारतात परतेल, पण ते होऊ शकले नाही. कमिन्स अहमदाबाद येथील चौथ्या कसोटीसाठी भारतात येणार की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कमिन्स म्हणाला की, “मी सध्या भारतात न परतण्याचा निर्णय घेतला आहे. मला वाटते की, मी माझ्या कुटुंबासोबत इथे चांगला आहे. मी क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि सहकाऱ्यांच्या समर्थनासाठी त्यांचे आभार मानतो.”
स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या कसोटीनंतर त्याच्या पत्नीनंतर काही दिवसांच्या प्रवासासाठी दुबई गेला आहे. त्याला कमिन्सच्या पुढील कसोटीतून बाहेर होण्याबाबतच्या निर्णयाची सूचना दुबईतच मिळाली. स्मिथने 2021मध्ये उपकर्णधारपद स्वीकारल्यानंतर ऍडलेड येथे झालेल्या 2 कसोटीत संघाचे नेतृत्व केले आहे.
मागील दौऱ्यावर स्मिथ होता कर्णधार
स्मिथ 2014 आणि 2018मध्ये 34 कसोटी सामन्यात संघाचा कर्णधार होता. त्यात 2017मधील ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याचाही समावेश होता. त्या दौऱ्यात स्मिथने 3 शतके केली होती. मात्र, सध्याच्या मालिकेत त्याची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. त्याने 4 डावांमध्ये 23.66च्या सरासरीने 71 धावा केल्या आहेत. (skipper pat cummins to miss ind vs aus 3rd test steve smith to be australian captain in indore)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पराभवाचं दु:ख पचवू शकली नाही हरमनप्रीत, दिग्गज खेळाडूच्या गळ्यात पडून रडली ढसाढसा; तुम्हीही व्हाल भावूक
जर्सी नंबरपासून ते रनआऊटपर्यंत धोनी अन् हरमनमध्ये आहे बरेच साम्य, करिअरबाबतही तसंच होणार का?