इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये एक खेळाडू चांगलाच चमकदार कामगिरी करत आहे. त्याने मागील २ आयपीएल हंगामात फक्त ५ सामने खेळले होते. तो खेळाडू इतर कुणी नाही, तर कुलदीप यादव आहे. कुलदीपला मागच्या हंगामात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र, आता तोच या हंगामात फलंदाजांच्या दांड्या गुल करताना दिसत आहे. फक्त ६ सामन्यात कुलदीपने १३ विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. मात्र, कुलदीपच्या या प्रदर्शनामागील गुपीत आहे तरी काय? याचा खुलासा आता दिल्ली कॅपिटल्स संघाचा माजी सहाय्यक प्रशिक्षक मोहम्मद कैफने केला आहे.
मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) माध्यमांशी बोलताना म्हणाला की, “कुलदीप यादवच्या (Kuldeep Yadav) या कामगिरीचे श्रेय दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतला जाते. पंतही एक भावूक व्यक्ती आहे, हे खूप कमी लोकांना माहितीये. तो मनातून विचार करतो आणि त्याला माहितीये की, खेळाडूंकडून त्यांचे सर्वोत्तम प्रदर्शन कशाप्रकारे करवून घेतले जाऊ शकते. मी मागील वर्षी संघासोबत होतो. रिषभच होता, ज्याने आवेश खानला आधार दिला आणि आता तो कुलदीपच्या कारकीर्दीला रुळावर आणत आहे.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
“कुलदीप देतोय विकेट्स घेण्यावर भर”
या हंगामात कुलदीप यादवच्या यशामागील कारणही कैफने सांगितले. तो म्हणाला की, “कुलदीपला या हंगामात स्पष्टपणे सांगितले गेले आहे की, त्याने विकेट्स घेण्यावर भर दिला पाहिजे. तसेच, धावांबद्दल जास्त विचार केला नाही पाहिजे. साधारणत: कर्णधार गोलंदाजांना फायदेशीर गोलंदाजी करण्यास सांगतात. मात्र, पंतने कुलदीपला सांगितलंय की, तो विकेट घेणारा गोलंदाज आहे. तू जरी अधिकच्या १० धावा दिल्या, तरी तू मधल्या षटकात मला ३ विकेट्स घेऊन दिल्या पाहिजेत.”
पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात कुलदीपने शानदार गोलंदाजी केली होती. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २४ धावा देत २ विकेट्स घेतलेल्या. या कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते.
एमएस धोनीप्रमाणे पंतने कुलदीपला बनवले मॅचविनर
यंदाच्या हंगामात कुलदीप कशाचीही परवा करत नाहीये. त्यामुळे त्याला विकेट्स मिळत आहेत. याव्यतिरिक्त त्याच्या यशामागील कारण रिषभ पंतच्या रूपातील कर्णधार मिळणे हे आहे. तो प्रत्येक परिस्थितीत कुलदीपचे धैर्य वाढवत आहे. हे अगदी एमएस धोनीप्रमाणे आहे. धोनीनेही अशाचप्रकारे पंतचे धैर्य वाढवले होते.
कुलदीपचे फॉर्ममध्ये असणे हे भारतीय संघासाठीही चांगले आहे. कारण, यावर्षी टी२० विश्वचषक होणार आहे. त्याने अशीच कामगिरी केली, तर तो या स्पर्धेत भारतीय संघासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कर्णधार मयंकने ‘या’ ३ सुधारणा केल्या तरंच बरं, नाहीतर पंजाब संघ होऊ शकतो प्लेऑफमधून बाहेर
आयपीएलमध्ये ‘या’ विक्रमांमध्ये ‘नंबर वन’ आहे डेव्हिड वॉर्नर, अन्य कोणी आसपासही नाहीत