यजमान वेस्ट इंडिजविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार विजय मिळवला. डॉमिनिका कसोटी सामना भारताने 1 डाव आणि 141 धावांनी जिंकला. या विजयानंतर भारतीय संघासोबतच संपूर्ण देश आनंदी झाला. कर्णधार रोहित शर्मा याचा आनंदही गगनात मावेनासा झाला. याचा प्रत्यय रोहितने केलेल्या ट्वीटवरून येतो. त्याचे हे ट्वीट सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे.
रोहितचे ट्वीट
खरं तर, भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये रोहित फोनवर कुणाशीतरी बोलताना दिसत आहे. त्याने हा फोटो शेअर करत मजेशीर कॅप्शन दिले आहे. त्याचे कॅप्शन सर्वांचे लक्ष वेधत आहे. रोहितने ‘बाजीगर’ सिनेमातील एक डायलॉग कॅप्शनमध्ये लिहिला आहे. त्याने लिहिले की, “अनारकलीचा फोन होता. आईस्क्रीम खाणे खूपच गरजेचे आहे.”
Anarkali ka phone tha, ice cream khana bahut zaroori hai 📞😂 pic.twitter.com/v1ObmfCWNh
— Rohit Sharma (@ImRo45) July 15, 2023
आता रोहितचे हे ट्वीट जोरदार व्हायरल होत आहे. त्याच्या या ट्वीटवर 35 हजारांहून अधिक लाईक्स आणि 1300हून अधिक कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. एकाने कमेंट करत लिहिले की, “हाहाहा हा पण चेष्टा करतो.”
Ye bhi majaak karta hai 😆
— Sourabh Sanyal 🇮🇳 (@sourabhsanyal) July 15, 2023
दुसऱ्या एकाने लिहिले की, “हे कोणत्या लाईनमध्ये आलास हिटमॅन.”
Ye kis line Mai aagye Hitman aap 🤣
— Kadire Sunil (@Kadire_sunil) July 15, 2023
आणखी एकाने असेही लिहिले की, “वडापावही मागव.”
Vada pao bhi mangwa lijiyega 🤷🏻😂
— Ashish Kumar Jena (@Ashish_K_jena) July 15, 2023
रोहितचे शतक
विशेष म्हणजे, वेस्ट इंडिज दौऱ्यावरील पहिल्या कसोटीत रोहित शर्मा याने शतक झळकावले. त्याने यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) याच्यासोबत पहिल्या विकेटसाठी 229 धावांची भागीदारी रचली. यासोबत रोहितने कसोटीतील 10वे शतक पूर्ण केले. तसेच, जयसवालने पदार्पणाच्या कसोटीत 171 धावांची शतकी खेळी करत विक्रमांचा पाऊस पाडला.
अश्विनच्या 12 विकेट्स
यजमानांनी कसोटीच्या पहिल्या डावात 150 धावा केल्या होत्या. त्यांना या कमी धावसंख्येवर रोखण्यात आर अश्विन (R Ashwin) याने मोलाचा वाटा उचलला. या डावात त्याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. त्यानंतर भारतीय संघाने पहिला डाव 5 विकेट्स गमावत 421 धावांवर घोषित केला होता. विंडीज संघ दुसऱ्या डावात पक्त 130 धावांवर सर्वबाद झाला. या डावात भारताकडून अश्विनने सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या. अशाप्रकारे त्याने सामन्यात एकूण 12 विकेट्स नावावर केल्या. यामुळे त्याने अनेक विक्रमही रचले. (skipper rohit sharma celebrated first test match victory in west indies)
महत्वाच्या बातम्या-
ठरलं एकदाचं! ‘या’ दिवशी पुन्हा मैदानावर पाऊल ठेवणार बुमराह, तर श्रेयसला
पाकिस्तानची पुन्हा एकदा कुरापत! आशिया कपआधी केली नवीन मागणी