जगातील बलाढ्य क्रिकेट संघांमध्ये न्यूझीलंड संघाचीही गणना होते. न्यूझीलंड संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात प्रत्येकी 3 सामन्यांची वनडे आणि टी20 मालिका खेळली जाणार आहे. या दौऱ्याची सुरुवात वनडे मालिकेने होणार असून यातील पहिला सामना बुधवारी (दि. 18 जानेवारी) हैदराबाद येथे खेळला जाणार आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा नेट्समध्ये सराव करताना दिसला. त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे.
भारतीय संघाने न्यूझीलंडपूर्वी श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका खेळली. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने काही शानदार खेळी साकारल्या. आता न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतही रोहित याच इराद्याने मैदानात उतरेल. मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघ हैदराबाद येथे पोहोचला होता. तसेच, आता संघाच्या खेळाडूंनी सराव सत्रात भाग घेतला. यादरम्यान रोहित नेट्समध्ये फलंदाजी करताना दिसला. रोहितने काही अफलातून फटकेही खेळले. तसेच, चेंडूचा बचाव करण्याचा सरावही केला.
बीसीसीआयने (BCCI) रोहितच्या सराव सत्राचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत “भारतीय कर्णधार रोहित शर्मा न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या पहिल्या सामन्यापूर्वी लयीत येताना,” अशा आशयाचे कॅप्शन देण्यात आले आहे.
🔊 Sound 🔛#TeamIndia captain @ImRo45 gets into the groove ahead of the #INDvNZ ODI series opener 👍 👍 pic.twitter.com/NR6DaK56mg
— BCCI (@BCCI) January 17, 2023
श्रेयस अय्यर याच्या जागी रजत पाटीदारला संधी
वनडे मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय संघासाठी वाईट बातमी समोर आली. भारतीय संघाचा युवा फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याला पाठीच्या दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडावे लागले. त्याच्या जागी आता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा विस्फोटक फलंदाज रजत पाटीदार (Rajat Patidar) याची संघात एन्ट्री झाली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ईशान किशन (यष्टीरक्षक), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएस भरत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रजत पाटीदार, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक. (skipper rohit sharma practices in nets ahead of india vs new zealand odi series)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडविरुद्ध ईशान खेळणार! रोहितने केले शिक्कामोर्तब, मात्र जबाबदारी असणार वेगळी
‘विराटच्या मेंटल ब्रेकने त्याचे करिअर 4-5 वर्षांनी वाढवले’, माजी निवडकर्त्याची मोठी प्रतिक्रिया