श्रीलंकेविरुद्धची 3 सामन्यांची वनडे मालिका भारतीय संघाने 3-0ने जिंकली आहे. रविवारी (दि. 15 जानेवारी) तिरुवनंतपुरम येथे पार पडलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने तब्बल 317 धावांनी आतापर्यंतचा वनडेतील सर्वात मोठा विजय मिळवला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा याने जबरदस्त विक्रमही नावावर केला. रोहितने मिळालेल्या संधीचे सोने करत बलाढ्य विक्रम रचला आणि त्या विक्रमात भारतीय संघाचा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज होण्याचा मान मिळवला. चला तर रोहितने काय विक्रम रचलाय जाणून घेऊयात…
भारतीय संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 5 विकेट्स गमावत 390 धावा चोपल्या. या धावा करताना सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) याने 49 चेंडूत 42 धावा केल्या. या धावा करताना त्याने 2 चौकार आणि 3 षटकारांचा पाऊसही पाडला. या सामन्यापूर्वी रोहितने भारताच्या विजयात एकूण 11999 धावांचे योगदान दिले होते. या सामन्यात 42 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. अशाप्रकारे त्याने भारताच्या विजयात आतापर्यंत 12041 धावांचे योगदान देण्याचा कारनामा केला. त्यामुळे तो भारताच्या विजयात 12 हजारांहून अधिक धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला.
‘या’ फलंदाजांनी केलाय असा कारनामा
आतापर्यंत विराट कोहली (Virat Kohli) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) या दोन खेळाडूंनी हा कारनामा करून दाखवला आहे. विराटने भारतीय संघाच्या विजयात एकूण 16285 धावांचे योगदान दिले आहे. तसेच, अव्वलस्थानी असलेल्या सचिनने भारताच्या विजयात एकूण 17113 धावांचे योगदान दिले आहे. रोहित या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. तसेच, भारताचा माजी फलंदाज आणि सध्याचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड 10860 धावांसह या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
रोहितने आतापर्यंत खेळलेत 430 आंतरराष्ट्रीय सामने
भारतीय संघाकडून 2007मध्ये पदार्पण करणाऱ्या रोहित शर्मा याने आतापर्यंत भारताकडून एकूण 430 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यात 45 कसोटी, 237 वनडे आणि 148 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांचा समावेश आहे. कसोटीत त्याने 3137, वनडेत 9554 आणि आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 3853 धावा कुटल्या आहेत. (ind vs sl 3rd odi skipper rohit sharma on the verge of joining master blaster sachin tendulkar and virat kohli in special club)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जागतिक क्रिकेटमध्ये विराटचा दबदबा! विरोधी संघाविरुद्ध वनडेत सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम केला नावावर
हे पर्व सचिनचे नाही, तर विराटचे! वनडेत 46वे शतक ठोकण्यासाठी दोघांनी खेळले ‘एवढे’ डाव