---Advertisement---

परदेशात खेळताना रोहितचा नाद करायचा नाय! 10वे कसोटी शतक ठोकत गावसकरांचा विक्रमही काढला मोडीत

Rohit-Sharma
---Advertisement---

डॉमिनिका येथील विंडसर पार्क मैदानावर खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी यशस्वी जयसवाल चमकला. त्याने पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक झळकावत इतिहास रचला. जयसवालनंतर कर्णधार रोहित शर्मा यानेही शतक ठोकले. हे रोहितच्या कसोटी कारकीर्दीतील 10वे शतक ठरले. शतक ठोकल्यानंतर रोहित धावसंख्या पुढे नेऊ शकला नाही. तो फक्त 103 धावांवर बाद झाला. त्याला 76व्या षटकातील चौथ्या चेंडूवर ऍलिक अथानाजे याने जोशुआ डा सिल्वा याच्या हातून झेलबाद केले. सलामीवारांमध्ये पहिल्या विकेटसाठी 229 धावांची भागीदारी झाली. एकही विकेट न गमावता विरोधी संघावर आघाडी घेण्याची भारताच्या कसोटी इतिहासातील पहिलीच वेळ होती.

भारतीय कसोटी इतिहासात सहाव्यांदा दोन्ही सलामीवीरांनी परदेशात एका डावात शतक ठोकण्याचा पराक्रम केला. यापूर्वी मुरली विजय आणि शिखर धवन यांनी 2015मध्ये हा पराक्रम गाजवला होता. याव्यतिरिक्त रोहित शर्मासाठी हा सामना खास ठरला. त्याने यावेळी शतक ठोकत खास विक्रम आपल्या नावावर केला. रोहितने भारताबाहेर खेळताना सर्वाधिक 16 शतके झळकावली आहेत.

याबाबतीत त्याने भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनाही पछाडले आहे. रोहित आणि गावसकरांनंतर परदेशात सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या सलामी फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी शिखर धवन याच्या नावाचा समावेश आहे. धवनने परदेशात सलामीला खेळताना कसोटीत 10 शतके झळकावली आहेत.

परदेशात सर्वाधिक शतके करणारे भारतीय सलामीवीर
16- रोहित शर्मा*

15- सुनील गावसकर
10- शिखर धवन

https://twitter.com/BCCI/status/1679556066374303745?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1679556066374303745%7Ctwgr%5Ef7f07ad912a749ccd6cc25df2035ef8182e7e198%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.cricketcountry.com%2Fhi%2Fnews%2Frohit-sharma-scored-his-10th-test-century-surpass-sunil-gavaskar-as-an-opener-1103672

याव्यतिरिक्त रोहित जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक शतके करणारा भारतीय फलंदाजही बनला आहे. डब्ल्यूटीसी इतिहासात रोहितच्या नावावर सर्वाधिक 7 शतके आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानी मयंक अगरवाल असून त्याने 4 शतके केली आहेत. याव्यतिरिक्त तिसऱ्या स्थानी संयुक्तरीत्या विराट कोहली, रिषभ पंत आणि अजिंक्य रहाणे यांचा समावेश आहे. त्यांनी प्रत्येकी 3 शतके झळकावली आहेत. (skipper rohit sharma scored his 10th test century surpass sunil gavaskar as an opener batter)

डब्ल्यूटीसी इतिहासात सर्वाधिक शतके करणारे भारतीय फलंदाज
7- रोहित शर्मा*

4- मयंक अगरवाल
3- विराट कोहली
3- रिषभ पंत
3- अजिंक्य रहाणे

महत्वाच्या बातम्या-
तिसऱ्या क्रमांकावर गिलची चिरफाड, दिग्गजांचा सल्ला घेऊनही सपशेल फ्लॉप; अवघ्या 6 धावांवर परतला तंबूत
व्हिडिओ: पहिल्या कसोटी शतकानंतर भावूक झाला जयसवाल; म्हणाला, ‘मला स्वत:चा अभिमान…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---