डॉमिनिका येथे वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यातील पहिला डाव भारतीय खेळाडूंनी गाजवला. आधी गोलंदाजी करताना वेस्ट इंडिजला 150 धावांवर रोखले. त्यानंतर आपल्या पहिल्या डावात दिवसाचा खेळ संपेपर्यंत सलामीवीर यशस्वी जयसवाल आणि रोहित शर्मा यांनी धावफलकावर 80 धावा लावल्या. वेस्ट इंडिजविरुद्ध यशस्वीने कसोटी पदार्पण केले आहे. त्याला कर्णधार रोहितने पदार्पणाची कॅप दिली. तो कर्णधारासोबत सलामीला उतरला, यामुळे दोघांनी 40 वर्षांपूर्वीच्या विक्रमाची पुनरावृत्ती केली.
सामन्यात घडला मोठा कारनामा
पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार क्रेग ब्रेथवेट याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय सपशेल चुकीचा ठरला. यावेळी प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिज संघ फक्त 150 धावांवर सर्वबाद झाला. भारतासाठी आर अश्विन (R Ashwin) याने सर्वाधिक 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. याव्यतिरिक्त रवींद्र जडेजा यानेही 3 विकेट्स घेतल्या. तसेच, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांच्या खात्यातही एक विकेट पडली. यानंतर भारतीय संघाच्या डावात मोठा कारनामा घडला.
भारतीय संघासाठी यावेळी यशस्वी जयसवाल आणि रोहित शर्मा (Yashasvi Jaiswal And Rohit Sharma) यांनी डावाची सुरुवात केली. दोघेही प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मुंबई संघाकडून खेळतात. अशात 40 वर्षांनतर असे घडले की, मुंबईकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या फलंदाजांनी भारतासाठी सलामीला फलंदाजी केली. यापूर्वी असे 1983 मध्ये घडले होते. त्यावेळी सुनील गावसकर आणि रवी शास्त्री (Sunil Gavaskar And Ravi Shastri) यांनी भारतीय संघासाठी सलामीला फलंदाजी केली होती.
5⃣0⃣-run stand! ????#TeamIndia off to a solid start, courtesy Captain @ImRo45 & debutant @ybj_19 ????
Follow the match ▶️ https://t.co/FWI05P4Bnd #WIvIND pic.twitter.com/ys9kkbWh93
— BCCI (@BCCI) July 12, 2023
आयपीएलमध्ये चमकला होता जयसवाल
पहिल्या डावात यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) याने शानदार प्रदर्शन केले. तो नाबाद 40 धावांवर खेळतोय. त्याने आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन केले होते. त्यामुळे त्याला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. त्याने आयपीएल 2023 हंगामात राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना 14 सामन्यात 625 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये एका शतकाचाही समावेश आहे. (skipper rohit sharma yashavi jaiswal openers against west indies mumbai first class cricket sunil gavaskar ravi shastri 2023)
महत्वाच्या बातम्या-
हुश्श! ईशानच्या हातातून निसटलेला चेंडू, पण स्वत:ला सावरत दुसऱ्या हाताने टिपला अफलातून झेल, Video
केदार जाधवचं नशीब फळफळलं! ‘या’ दुखापतग्रस्त खेळाडूच्या जागी ताफ्यात झाला सामील