---Advertisement---

कॅप्टन सूर्या अन् अर्शदीपचं वाजलं? टीम इंडियाच्या बसमध्येच गोलंदाजावर चिडला Sky, पाहा Video

On: शनिवार, डिसेंबर 16, 2023 1:14 PM
Arshdeep-Singh-And-Suryakumar-Yadav
---Advertisement---

Suryakumar Yadav Angry at Arshdeep Singh: गुरुवारी (दि. 14 डिसेंबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील 3 सामन्यांची टी20 मालिका संपुष्टात आली. मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारताने 106 धावांनी विजय मिळवत मालिका 1-1ने बरोबरीत सोडवली. या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव याने लौकिकाला साजेशी कामगिरी केली. त्याने या सामन्यात शतक झळकावत संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. तसेच, सामन्यानंतर याच कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. मात्र, जेव्हा संघ स्टेडिअममधून हॉटेलला रवाना होत होता, तेव्हा संघाच्या बसमध्ये विचित्र घटना पाहायला मिळाली. यावेळी सूर्यकुमार यादव अर्शदीप सिंगवर चिडला असल्याचे दिसत आहे. आता व्हिडिओ व्हायरल होतोय.

टी20तील चौथे शतक
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने जोहान्सबर्ग येथील न्यू वाँडरर्स स्टेडिअममध्ये मालिकेतील अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध शतक ठोकले. त्याने 56 चेंडूत 100 धावा केल्या. यामध्ये 7 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. हे त्याचे टी20तील चौथे शतक होते. अशाप्रकारे तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 4 शतके मारणारा जगातील संयुक्तरीत्या अव्वल फलंदाज बनला आहे. त्याने या विक्रमात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) यांची बरोबरी केली आहे. मात्र, सामन्यानंतरच्या घटनेमुळे सूर्या चर्चेत आहे.

नेमकं काय घडलं?
खरं तर, सामन्यानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि अर्शदीप सिंग (Suryakumar Yadav And Arshdeep Singh) यांच्याबाबत संघाच्या बसमध्ये हैराण करणारी घटना समोर आली आहे. या व्हिडिओत दिसते की, सूर्या सहकारी खेळाडू अर्शदीपला बोट दाखवून काहीतरी गंभीर गोष्ट बोलत आहे. असे असू शकते की, तो कुठल्या तरी गोष्टीवरून रागावला असेल, पण असेही असू शकते की, ही त्यांच्यातील एक थट्टा-मस्करीचा भाग असेल. मात्र, या व्हिडिओचे सत्य काय आहे, हे अद्याप समोर आले नाहीये.

व्हिडिओत काहीही दिसत असले, तरीही हेही तितकेच खरे आहे की, भारतीय संघातील खेळाडूंमध्ये कशाप्रकारचे वातावरण असते. सामन्यानंतर खेळाडू नेहमीच मजा-मस्ती करताना दिसतात. अनेकदा व्हिडिओ शूट करतानाही अशाप्रकारची थट्टा खेळाडू करताना दिसतात. संघाच्या कर्णधाराचेही म्हणणे असते की, जर कोणी मैदानात चूक केली असेल, तर त्याविषयी त्याला मैदानाबाहेर बोलले जाऊ शकत नाही. (Skipper suryakumar yadav angry at arshdeep singh in team bus after 3rd t20i vs south africa see viral video )

हेही वाचा-
हरमनसेनेची कमाल! एकमेव कसोटी सामन्यात इंग्लंडला 347 धावांनी चारली धूळ, दीप्ती शर्मा विजयाची नायिका
मुंबई-रोहित-हार्दिकच्या वादात सूर्याची उडी? ट्विटर पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---