पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा जबरदस्त प्रदर्शन सुरूच आहे. शनिवारी (१६ जुलै) श्रीलंक आणि पाकिस्तान संघातील कसोटी मालिकेची सुरुवात झाली. मालिकेतील पहिला सामना गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या डावात पाकिस्तान संघासाठी कर्णधार बाबर आझमने शतक ठोकले. यादरम्यान त्याने भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीच्या एका मोठ्या विक्रमही मोडला. बाबरच्या शतकामुळे पाकिस्तानने समाधानकार धावसंख्या केली मात्र, संघ पहिल्या डावात श्रीलंकेपेक्षा ४ धावांनी मागे पडला.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकन संघाचा कर्णधार दिमुथ करूणारत्नेने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. गॉल स्टेडियवची खेळपट्टी पहिल्या डावात गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरली. प्रथम फलंदाजी करणारा श्रीलंकन संघ २२२ धावांवर गुंडाळला गेला. तर पाकिस्तान संघासाठीही एकटा बाबर आझम (Babar Azam) चांगले प्रदर्शन करू शकला.
बाबर आझमने सामन्याच्या पहिल्या डावात २१६ चेंडूंमध्ये १०० धावा पूर्ण केल्या. १० चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर बाबरणे हे शतक ठोकले. या खेळीदरम्यान बाबरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःच्या १०,००० धावा पूर्ण केल्या. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००० धावा करण्यासाठी २३२ डाव खेळावे लागले होते. पण या सामन्यात बाबर विराटपेक्षा सरस ठरला. त्याने अवघ्या २२८ डावांमध्ये १०,००० धावांचा टप्पा पार केला आहे. तो आता सर्वात कमी डावांमध्ये १०,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा आशियाई खेळाडू बनला आहे.
SENSATIONAL EFFORT 💥@babarazam258 scores a special seventh Test 💯#SLvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/oWHyasNwuM
— Pakistan Cricket (@TheRealPCB) July 17, 2022
श्रीलंका आणि पाकिस्तानमधील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर जयमान संघाचा पहिला डावा सामन्याच्या पहिल्याच दिवशी गुंडाळला गेला. दिनेश चंदीमलने ११५ चेंडूत सर्वाधिक १७६ धावा केल्या. दुसरा एकही फलंदाज पहिल्या डावात श्रीलंकेसाठी अर्धशतक करू शकला नाही. शाहीन आफ्रिदीने टाकलेल्या १४.१ षटकात ५८ धावा खर्च केल्या आणि सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात पाकिस्तान संघ फलंदाजीसाठी आल्यानंतर त्यांच्या खेळाडूंनीही झटपट विकेट्स गमवायला सुरुवात केली. संघाची धावसंख्या २४ असताना पाकिस्तानने पहिल्या तीन विकेट्स गमावल्या होत्या. पण नंतर बाबर आझमने डाव संभांळला. बाबरने या सामन्यात एकूण २४४ चेंडू खेळले आणि ११९ केल्या. बाबरव्यतिरिक्त पाकिस्तान संघातील एकही खेळाडू २० धावांची खेळी करू शकला नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारताचा ‘सूर्या’उदय होण्यात कॅप्टन रोहित शर्माचा मोठा हात
ENG vs IND | निर्णायक सामन्यात जसप्रीत बुमराहला दिलेली विश्रांती भारताला भोवणार ?
ENG vs IND | निर्णायक सामन्यात जसप्रीत बुमराहला दिलेली विश्रांती भारताला भोवणार ?