ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेविड वॉर्नरने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एखदिवसीय सामन्यात अप्रतिम क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन केले. मंगळवारी (१४ जून) श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू झाली. पहिल्या सामन्यात श्रीलंकन संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकन संघाने ११५ धावांपर्यंत एकही विकेट गमावली नव्हती, पण पुढच्या १९ धावा करताना संघाने तीन महत्वाच्या विकेट्स गमावल्या. यादरम्यान डेविड वॉर्नरने एक जबरदस्त झेल घेतला.
श्रीलंकन संघ फलंदाजी करत असताना २६ व्या षटकात एस्टन एगर गोलंदाजीसाठी आला. षटकातील ५ व्या चेंडूवर धनंजय डिसिल्वा (Dhananjay De Silva) स्ट्राईकवर होता. हा चेंडूवर डिसिल्वाने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण त्याने मारलेला शॉट लॉन्ग ऑफच्या दिशेने होता आणि तो ३० यार्ड सर्कलच्या बाहेर जाऊ शकला नाही. त्याठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी उभा असेलला डेविड वॉर्नर (David Warner) याने एक अप्रतिम झेल पकडून डिसिल्वाला तंबूचा रस्ता दाखवला. त्याला मोठी खेळी करता आली नाही, १७ चेंडूत ७ धावा करून डिसिल्वाने मैदान सोडले.
https://twitter.com/NageswarGajula/status/1536666080264957953?s=20&t=XVnXl_PbdksKDPS4xqHT3g
संघाची धावसंख्या ११५ असताना त्यांनी एकही विकेट गमावली नव्हती, पण डिसिल्वाची विकेट जेव्हा पडली, तेव्हा धावसंख्या होती ३ विकेट्सच्या नुकसानावर १३४. या मधल्या १९ धावांमध्ये दानुष्का गुनाथिलका (५५) आणि पथुम निशांका (५६) यांनी खूप कमी अंतराने विकेट्स गमावल्या. या दोन्ही सलामीवीरांनी वैयक्तिक अर्धशतके ठोकली आणि शतकी भागीदारी देखील केली.
श्रीलंकन संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ विकेट्सच्या नुकसानावर ३०० धावा उभ्या केल्या. यामध्ये सर्वात मोठे योगदान राहिले यष्टीरक्षक फलंदाज कुसल मेंडिसचे. त्याने ८७ चेंडूत नाबाद ८६ धावा केल्या. यामध्ये ८ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. त्याव्यतिरिक्त चरीथ असालांकाने ३७, तर वानिंदू हसरंगाने ३७ धावांचे योगदान दिले.
दरम्यान, ऑस्ट्रेलियासाठी एस्टन एगरने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. ३०१ धावांचा पाठलाग करण्यासाठी जेव्हा ऑस्ट्रेलियाचे फलंदाज खेळपट्टीवर आले, तेव्हा मात्र पावसाने बाधा आणली. ऑस्ट्रेलियाने २ विकेट्सच्या नुकसानावर ७२ धावा केल्या होत्या, पण पावसामुळे खेळ थांबवला गेला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘यामुळे कार्तिकला टी२० विश्वचषकाच्या संघात घेणार नाही’, भारताच्या माजी दिग्गजाने वर्तवले भाकित
उत्तर प्रदेशविरुद्ध उपांत्य सामन्यात जयस्वालची ‘यशस्वी’ खेळी, मुंबईसाठी ठोकले शतक
जितकी चर्चा झाली, खरंच तितका वाद धोनी आणि सेहवागमध्ये होता का?