ऑस्ट्रेलिय संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी सध्या श्रीलंका दौऱ्यावर आला आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल याठिकाणी खेळला जात आहे. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघ यजमान श्रीलंकावर भारी पडल्याचे पाहिले गेले होते. परंतु दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी स्टेडियममध्ये एक मोठा अपघात घडला.
श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्याती गॉल कसोटी सामन्याचा दुसरा दिवस सुरू होण्यापूर्वी प्रेक्षकांना बसण्यासाठी उभे केलेले स्टॅन्ड कोसळले. जोरदार पाऊस आणि वेगवान हवेमुळे हा अपघात घडल्याचे समजते. जेव्हा हे स्टॅन्ड कोसळले, तेव्हा सुदैवाने त्याठिकाणी कोणीही बसलेले नव्हते. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्याच्या अंदाजे ९० मिनिट आधी हा प्रसंग घडला.
ऑस्ट्रेलियन संघ सामना सुरू होण्याच्या आधी सराव करत होता, तितक्यात हा प्रकार घडला. दरम्यान, व्हिडिओत पाहिले जाऊ शकते की, कोसळलेले हे स्टॅन्ड तात्पुरत्या स्वरूपाचे होते. प्रेक्षकांची सोय करण्यासाठी त्याठिकाणी मंडप दिला गेला होता, जो हवा वेगाने आल्यामुळे खाली पडला आहे. मैदानी कर्मचाऱ्यांना मात्र ही जागा मोकळी करावी लागणार असल्यामुळे त्याची जास्त कसरत होणार यात शंका नाही.
https://twitter.com/FlashCric/status/1542374530265382912?s=20&t=J48gQISoXXMwA0QyfDCS4Q
दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात पावसामुळे एकही चेंडू टाकला गेला नाही. पहिल्या दिवसाचा विचार केला, तर श्रीलंकेचा संपूर्ण संघ स्वस्तात गुंडाळला गेला होता. श्रीलंकन कर्णधार दिमूथ करूणारत्नेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवला. पहिल्या डावात श्रीलंका संघाला अवघ्या २१२ धावांवर समाधान मानावे लागले. ऑस्ट्रेलियाच्या नाथन लायनने ९० धावा खर्च करून ५ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया संघ जेव्हा फलंदाजीसाठी आला, तेव्हा पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्यांनी तीन महत्वाच्या विकेट्स गमावल्या होत्या. पहिल्या दिवशी तीन विकेट्सच्या नुकसानावर ९८ धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने दुसरा संपूर्ण दिवस फलंदाजी केली. दुसरा दिवस संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने ८ विकेट्सच्या नुकसानावर ३१३ धावा केल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘जेव्हा स्मिथच्या अंगात स्टार्क संचारतो’, पाहा व्हायरल होणार भन्नाट व्हिडिओ
ऑस्ट्रेलियन फिरकीपटूनेच अखेर केली शेन वॉर्नची बरोबरी, वाचा काय आहे अनोखा विक्रम
मन जिंकलस भावा! विराट कोहलीची आपुलकी कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ






