---Advertisement---

उस्मान ख्वाजानं द्विशतक ठोकून रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा पहिलाच ऑस्ट्रेलियन

---Advertisement---

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 (BGT) च्या पाच डावांमध्ये एकूण 184 धावा काढल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाची कसोटी कारकीर्द पूर्णपणे थांबणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र श्रीलंकेला जाताच त्याने इतिहास रचला आहे. बीजीटीमध्ये 10 डावात 200 धावाही करू न शकलेल्या ख्वाजाने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या डावात द्विशतक झळकावले आहे. श्रीलंकेत कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा तो ऑस्ट्रेलियाचा पहिला क्रिकेटपटू ठरला. त्याने कसोटी क्रिकेटमध्येही त्याची बुडणारी बोट किनाऱ्यावर आणली आहे.

उस्मान ख्वाजाने 290 चेंडूत 16 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने आपले द्विशतक पूर्ण केले आहे. जे त्याचे कसोटी क्रिकेटमधील पहिले द्विशतक आहे. या सामन्यात ट्रॅव्हिस हेडसोबत सलामीला आलेला उस्मान ख्वाजाने दुसऱ्या दिवशी तसेच पहिल्या दिवशीही उत्तम लयीत खेळ खेळत आहे. बीजीटीमध्ये पहिल्या तीन सामन्यांमध्ये उस्मान ख्वाजा पूर्णपणे अपयशी ठरला. मागील दोन सामन्यांमध्ये त्याने काही धावा केल्या असल्या तरी, संपूर्ण मालिकेत तो 200 धावांचा टप्पाही गाठू शकला नाही. त्याने 5 सामन्यांच्या 10 डावात एकूण 184 धावा केल्या होत्या. ज्यात त्याची सरासरी 20.44 होती.

डावखुरा फलंदाज उस्मान ख्वाजा 2016 मध्ये गॅलेमध्ये एकाच दिवशी दोनदा बाद झाला होता. उस्मान ख्वाजा फिरकी गोलंदाजीविरुद्ध खेळू शकत नाही असे म्हटले जात होते. पण आता तो 2025 मध्ये फिरकी गोलंदाजीवर वर्चस्व गाजवत आहे. श्रीलंकेत कसोटीत द्विशतक करणारा तो पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू बनला आहे. मालिकेपूर्वी त्याने निवृत्तीबाबत एक विधानही दिले होते. ज्यात त्याने म्हटले होते की जर ऑस्ट्रेलियन संघाला वाटत असेल की त्याची गरज नाही तर तो कसोटी क्रिकेट सोडेल. आता द्विशतक झळकावून त्याने सर्व टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे.

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, पहिल्या खेळताना ऑस्ट्रेलियाने या बातमीखेरीस तीन गड्यांच्या मोबदल्यात 497 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये उस्मान ख्वाजा (212) आणि जोश इंग्लिस (58) धावांवर नाबाद क्रीझवर आहे.

हेही वाचा-

आधी शतक आता हॅट्ट्रीक, मुंबईचा हा खेळाडू रणजी ट्राॅफीमध्ये घालतोय धुमाकूळ, टीम इंडियामध्ये परतणार?
किंग कोहलीसाठी स्टेडियमबाहेर तुफान गर्दी, विराटच्या नावानं मैदान दणाणलं..! पाहा VIDEO
टीम इंडियामध्ये आणखी एका डीएसपीचा समावेश, मोहम्मद सिराजनंतर या क्रिकेटपटूनं स्वीकरला पदभार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---