पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज वसीम अक्रम याची गणना आजही दिग्गज खेळाडूंच्या यादीत केली जाते. खेळपट्टी कुठलीही असो हा गोलंदाज आपल्या धारदार गोलंदाजीने फलंदाजांना माघारी धाडण्यास सक्षम होता. वनडे क्रिकेटमध्ये त्याने ५०० गडी बाद करण्याचा विक्रम केला होता. असे अनेक विक्रम त्याने आपल्या नावावर केले होते. अशातच बांगलादेश संघाचा खेळाडू मेंहदी हसन याने वसीम अक्रमच्या एका खास विक्रमाची बरोबरी केली आहे. चला तर पाहूया कुठला आहे तो खास विक्रम?
बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना रविवारी (२३ मे) मीरपूर मध्ये खेळवला गेला. या सामन्यात बांगलादेश संघाने श्रीलंका संघावर ३३ धावांनी विजय मिळवला. यामध्ये मेंहदी हसन याने उत्कृष्ट गोलंदाजी करत ४ गडी बाद केले होते. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर बांगलादेश संघाला विजय मिळवण्यात यश आले.
वसीम अक्रमच्या कामगिरीची केली पुनरावृत्ती
वनडे क्रिकेटमध्ये एका गोलंदाजाने गोलंदाजी करताना ४ गडी बाद करणे यात मोठी गोष्ट काय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. यात मुख्य बाब म्हणजे त्याने गोलंदाजी करताना ४ गडी बाद केले. परंतु ३ फलंदाजांना त्याने क्लीन बोल्ड केले होते. यासोबतच चौथा गडी त्याने आपल्याच गोलंदाजीवर अप्रतिम झेल टिपत बाद केला होता. तसेच त्याने क्षेत्ररक्षण करताना ३ झेल देखील टिपले होते. संपूर्ण सामन्यात त्याने आपले योगदान दिले होते.
यापूर्वी असा कारनामा पाकिस्तान संघातील दिग्गज खेळाडू वासीम अक्रमने केला होता. त्याने देखील १९९९ मध्ये हा कारनामा श्रीलंका संघाविरुद्ध केला होता. त्यावेळी भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात तिरंगी मालिका खेळवण्यात आली होती. ज्यामध्ये त्याने ३ गडी बाद केले होते. त्या तीनही फलंदाजांना त्याने क्लीन बोल्ड केले होते. यासोबतच त्याने ३ झेल देखील टिपले होते. या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर पाकिस्तान संघाने हा सामना ९ गडी राखून जिंकला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
गुणी मुलगी! आपल्या वडिलांची ‘ही’ इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रीति झिंटाने खरेदी केली होती आयपीएल टीम
विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात कशी असेल भारताची सलामी जोडी? ‘हे’ आहेत ४ पर्याय
‘रोहित शर्माला इंग्लंडमध्ये कसोटीत खेळणं जाणार महाकठीण, कारण…’