आशिया कप 2022 चा अंतिम सामना रविवारी (11 सप्टेंबर) संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. पाकिस्तान आणि श्रीलंका (PAK vs SL) यांच्यातील हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. सामन्याच्या अर्धा तास आधी नाणेफेक होणार आहे आणि यासह आशियाचा चॅम्पियन कोण होणार हे जवळपास निश्चित होणार आहे.
वास्तविक, दुबईत झालेल्या गेल्या काही सामन्यांचे निकाल पाहिल्यास नाणेफेक येथे बॉस असल्याचे स्पष्ट होते. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी निवडतो आणि नंतर सहज सामना जिंकतो. येथे मागील 22 सामन्यांमध्ये 19 वेळा प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. अशा परिस्थितीत, हे स्पष्ट आहे की सामन्याचा पहिला चेंडू टाकण्यापूर्वीच आशिया चषक 2022 ची ट्रॉफी कोणाला मिळणार हे जवळपास निश्चित होणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘पोलार्ड, रसेल अन् पूरन असूनही संघाने गमावला सामना!’ कमी धावसंख्येचा पाठलाग करण्यास फेल ठरले दिग्गज
टी20 विश्वचषकासाठी माजी दिग्गजाने निवडला भारतीय संघ! आशिया चषकात नसलेल्या ‘या’ खेळाडूंना दिलंय स्थान