---Advertisement---

लॅब्यूशेन ते आझम यांना बाद करणारा ‘जयसूर्या’चा कसोटीमध्ये धुमाकूळ सुरूच, दोन सामन्यांत घेतले इतके विकेट्स

On: बुधवार, जुलै 20, 2022 3:08 PM
Prabath Jayasuriya vs PAK
---Advertisement---

श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान  (SLvsPAK) यांच्यात दोन कसोटी मालिकेतील पहिला सामना झाला आहे. गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा ४ विकेट्सने पराभव केला आहे. यजमान संघ पराभूत झाला तरी गोलंदाज प्रबत जयसूर्याने याही सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने या सामन्यात ९ विकेट्स घेतल्या आहेत.

फिरकीपटू प्रबत जयसूर्या (Prabath Jayasuria) हा त्याच्या कारकिर्दीतील दुसराच कसोटी सामना खेळला आहे. त्याने याच महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच डावात त्याने ११८ धावा ६ विकेट्स घेतल्या असून त्याची ही कसोटीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. या सामन्यात त्याने १७७ धावा देत १२ विकेट्स घेतल्या होत्या.

कारकिर्दीच्या दुसऱ्या सामन्यात प्रबतने पाकिस्तान विरुद्धही उत्तम गोलंदाजी करत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam), मोहम्मद रिजवान यांच्या विकेट्स घेतल्या आहेत. या सामन्यात त्याने पाकिस्तानच्या पहिल्या डावात ३९ षटकांमध्ये ८२ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. यातील १० षटके निर्धाव टाकली आहेत. तर दुसऱ्या डावात ४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची कसोटीतील पहिली विकेट मार्नस लॅब्यूशेनची ठरली आहे.

या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने (Dimuth Karunaratne) याने नाणफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिनेश चंडिमल (Dinesh Chandimal) याच्या ७६ धावांच्या जोरावर श्रीलंकेने पहिल्या डावात सर्वबाद २२२ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने २१८ धावा केल्या. यामध्ये बाबरने ११९ धावा केल्या. ४ धावांची आघाडी असताना श्रीलंकेने दुसऱ्या डावात ३३७ धावा केल्या. यामध्ये ओशाडा फर्नांडोने ६४, कुशल मेंडीसने ७६, चंडीमलने नाबाद ९४ धावा केल्या आहेत.

पाकिस्तानने दुसऱ्या डावात ६ विकेट्स गमावत ३४२ लक्ष्य पार केले आहे. पाकिस्तानला जिंकण्यासाठी ११ धावांची गरज असताना पावसामुळे सामना थांबवण्यात आला होता. यावेळी पाकिस्तानचा सलामीवीर अब्दुल्लाह शफिकने नाबाद १६०, बाबरने ५५ आणि रिजवानने ४० धावा केल्या. प्रबतने ४ विकेट्स घेतल्या तर रमेश मेंडीस आणि धनंजया डी सिल्वा यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या.

श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान दुसरा सामना २४ जुलैला याच मैदानावर खेळला जाणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

प्रभत जयसूर्याच्या फिरकीवर पाकिस्तानचा शफीक पडलाय भारी, ४०० पेक्षा जास्त चेंडू खेळत श्रीलंकेवर केली मात

काय सांगता! आयपीएलच्या ‘या’ फ्रँचायझीने दक्षिण आफ्रिकेत विकत घेतलेत ६ टी२० संघ

युवा खेळाडूंमुळे बदललाय राहुल द्रविडचा स्वभाव, वेस्ट इंडीज दौऱ्यात दिसला नवीन अंदाजात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---