पाकिस्तानचा पुरूष क्रिकेट संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. यातील पहिल्या कसोटी सामन्याला गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमध्ये सुरूवात झाली आहे. या सामन्याचा आज (१६ जुलै) पहिल्या दिवसाचा खेळ सुरू आहे. श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी त्याचा हा निर्णय चांगलाच अंगलट आला असल्याचे दिसले आहे. त्यांचा पहिला डाव सर्वबाद २२२ धावांतच संपुष्टात आला आहे.
यामध्ये पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन अफ्रिदी (Shaheen Afridi) याने यजमान संघाचे कंबरडे मोडले आहे. त्याने सलामीवीर दिमुथ करुणारत्ने (Dimuth Karunaratne) याला त्रिफळाचीत करत संघाला पहिला धक्का दिला आहे. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीमध्ये ८६ धावांची खेळी केली होती. यामुळे पाकिस्तान संघासाठी ही मोठी विकेट ठरली आहे.
अफ्रिदी हा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये सुरूवातीला विकेट्स घेण्यात प्रसिद्ध आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही त्याने अशीच कामगिरी केली आहे. करुणारत्ने हा ७ चेंडूत केवळ १ धावा करू शकला. अफ्रिदीने टाकलेला चेंडू ज्याप्रकारे आता आला त्याप्रकारे फलंदाजांकडे दुसरी संधीच नव्हती आणि तो बाद झाला आहे.
Bowled!! Karunaratne b Shaheen Afridi 1(7)
Shaheen Shah Afridi gets the big wicket of Dimuth Karunaratne early #SLvPAK @iShaheenAfridi #BabarAzam𓃵 pic.twitter.com/p7p77QlgKo
— M Umair Mughal (@umairmughal0308) July 16, 2022
सध्या तरी श्रीलंकेच्या पहिल्या डावात दिनेश चंडिमल (Dinesh Chandimal) याने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने ११५ चेंडूत ७६ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने १० चौकार आणि १ षटकार मारला आहे. त्याला हसन अलीने यासीर शाहकरवी झेलबाद केले आहे. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यात नाबाद द्विशतकी खेळी केली होती. यामुळे पाकिस्तान संघाचा मोठा अडसर दूर झाला आहे.
https://youtu.be/AFnDoiDAxDk
अफ्रिदीने धनंजया डी सिल्वा यालाही त्रिफळाचीत केले. तर लगेच त्याने त्याच्या पुढच्या षटकामध्ये निरोशन डीकवेला यालाही बाद केले. त्याचबरोबर महीश तीक्क्षनाचीही विकेट घेतली आहे. यामुळे अफ्रिदीने १४.१ षटकात ५८ धावा देत ४ विकेट्स घेतल्या आहेत.
Shaheen Afridi's four-for restricts Sri Lanka to a modest total.
Buy the Test series pass and watch #SLvPAK LIVE on https://t.co/CPDKNx77KV (in select regions) 📺#WTC23 | 📝 Scorecard: https://t.co/Zjbsh8YQTK pic.twitter.com/LAP8ooZfuB
— ICC (@ICC) July 16, 2022
अफ्रिदीबरोबरच हसन अलीने २, नसीम शाह १, यासिर शाह २ आणि मोहम्मद नवाजने १ विकेट घेतली आहे. पाकिस्तानचा पहिला डाव सुरू झाला असून ४.३ षटकात १२ धावा केल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतापुढे ऑस्ट्रेलियाचे आव्हान, सुवर्णपदक जिंकण्यासाठी करतोय तयारी
पंजोबा, आजोबा, वडील सर्वच क्रिकेटपटू होते, पण एका चुकीने संपलय ‘त्याचं’ करिअर
अरर ! लईच वाईट अवस्था, सराव करायचाय पण श्रीलंकन खेळाडूंकडे नाहीये ‘ही’ गोष्ट