सध्या श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील दुसरा टी20 सामना मंगळवारी (15 ऑक्टोबर) डंबुला येथील रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना जिंकून श्रीलंकेने पहिल्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजकडून झालेल्या पराभवाचा बदला घेतला.
मालिकेतील पहिल्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजने 5 गडी राखून विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या टी20 मध्ये श्रीलंकेने वेस्ट इंडिजचा 73 धावांनी पराभव करत मालिकेत बरोबरी केली. आता तिसरा आणि शेवटचा टी20 अंतिम म्हणून खेळला जाईल. ज्यामधील विजयी संघ मालिका जिंकेल.
पहिल्या टी20 मध्ये शानदार विजयाची नोंद करणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर श्रीलंकेने 20 षटकात 162/5 धावा केल्या. पथुम निसांकाने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने 49 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 54 धावा केल्या. तर गोलंदाजीत वेस्ट इंडिजकडून रोमारिया शेफर्डने सर्वाधिक 2 बळी घेतले.
लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 16.1 षटकांत 89 धावांत सर्वबाद झाला. कर्णधार रोव्हमन पॉवेलने संघाकडून 20 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला चांगली सुरुवात करता आली नाही. संघाने सुरुवातीपासूनच विकेट्स गमावण्यास सुरुवात केली. तिसऱ्या षटकात 12 धावांवर ब्रँडन किंगच्या रूपाने संघाला पहिला धक्का बसला. त्यानंतर पुढच्याच षटकात एविन लुईस बाद झाला. त्यानंतर पुढच्याच षटकात रोस्टन चेस पॅव्हेलियनमध्ये परतला. याप्रमाणे संघाने झटपट विकेट गमावल्या.
श्रीलंकेकडून गोलंदाजी करताना ड्युनिथ वेललागेने सर्वाधिक 3 बळी घेतले. याशिवाय कर्णधार चरिथ असलंका, महिष तिक्षाना आणि वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. उर्वरित एक विकेट मथिशा पाथिरानाने मिळवले.
हेही वाचा-
भारत-न्यूझीलंड कसोटीपूर्वी बेंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस, टाॅसला उशीर, जाणून घ्या लेटेस्ट अपडेट
बीसीसीआय कर्णधाराला हटवण्याच्या तयारीत! भारताच्या खराब कामगिरीमुळे निर्णय?
‘दोघांची नावे…’- विराट कोहली-बाबर आझमच्या तुलनेवर भारतीय दिग्गज संतापला!