---Advertisement---

‘पाकिस्तानी लोकांचे छोटे-छोटे आनंद…’, माजी भारतीय क्रिकेटपटूंनी उडवली शहबाज शरीफ यांची थट्टा

On: शुक्रवार, जानेवारी 30, 2026 6:39 PM
---Advertisement---

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या 3 सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना (29 जानेवारी) रोजी झाला. या सामन्यात पाकिस्तानने 22 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पाकिस्तानच्या या विजयानंतर पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली, ज्यावरून माजी भारतीय क्रिकेटपटू अजय जडेजा आणि आकाश चोप्रा यांनी त्यांची जाहीर थट्टा केली.

​ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला सामना जिंकल्यानंतर शहबाज शरीफ यांनी सोशल मीडियावर हा क्षण देशासाठी अभिमानास्पद असल्याचे म्हटले. त्यांनी लिहिले, “पहिल्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शानदार कामगिरीबद्दल टीम पाकिस्तानचे अभिनंदन… देशासाठी अभिमानाचा क्षण.”

​पाकिस्तानी पंतप्रधानांच्या या पोस्टची अजय जडेजा यांनी मस्करी केली आणि लिहिले, “पाकिस्तानी लोकांचे छोटे-छोटे आनंद. द्विपक्षीय मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या पंतप्रधानांचे ट्विट पाहिले आहे.”

​अजय जडेजा यांच्याशिवाय आकाश चोप्रा यांनीही पाकिस्तानी पंतप्रधानांच्या पोस्टचा समाचार घेतला आणि ‘X’ वर लिहिले, “हा ऑस्ट्रेलियाच्या ‘बी’ टीमविरुद्धचा द्विपक्षीय टी20 सामना आहे. त्यांचे अनेक मुख्य खेळाडू यात खेळत नाहीयेत. तसेच 170 धावांच्या सामन्यात 20 धावांनी मिळालेल्या विजयाला कोणत्याही प्रकारे ‘रोमहर्षक’ म्हणता येणार नाही.”

​पाकिस्तान सध्या क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. आगामी टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सहभागी होणार की नाही, याबाबत पाकिस्तानने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. पीसीबीने (PCB) हा निर्णय पूर्णपणे पाकिस्तान सरकारवर सोपवला आहे. बांगलादेश बाहेर पडल्यानंतर पाकिस्तानने विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. या पार्श्वभूमीवर मोहसीन नकवी यांनी पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भेट घेतली होती, मात्र अद्याप त्यांनी काहीही स्पष्ट केलेले नाही

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---