बर्मिंघम, इंग्लंड येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games) या स्पर्धेत भारताचे पदकाचे खाते उघडले आहे. संकेत सरगरने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. त्याने ५५ किलोग्राम वजनी गटात हे पदक मिळवले आहे. त्याने स्नॅच आणि क्लीन एंड जर्क यांमध्ये एकूण २४८ किलोग्राम वजन उचलत रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे.
संकेत महादेव सरगर (Sanket Mahadev Sargar) हा महाराष्ट्रातील सांगली येथील रहिवासी आहे. २१ वर्षीय संकेत कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. त्याच्या वडिलाची सांगली येथे चहाची टपरी आहे. तर त्याच्या वडिलांनी संकेतने मिळवलेल्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी काही वेळ काम बंद ठेवले होते. त्यांनी दिर्घ काळातून पहिल्यांदाच कामातून ब्रेक घेतला आहे. “एक तासाच्या ब्रेकने काही फरक पडणार नाही,” असे महादेव यांनी म्हटले आहे. (इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार)
मागील महिन्यातच संकेतची लहान बहिण काजोलने खेलो इंडिया युथ गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. “जेव्हा काजोल पदक जिंकून आली तेव्हा आम्ही तिचे पदक पहिल्यांदा या चहाच्या दुकानावरच आणले होते. याच टपरीने आमच्या आयुष्याचा गाडा ओढला आहे. यामुळे संकेतचे पदकही सर्वप्रथम येथेच ठेवले जाणार आहे,” असेही महादेव यांनी पुढे म्हटले आहे.
राष्ट्रीय पराक्रम
संकेत हा भारताचा स्टार वेटलिफ्टर आहे. राष्ट्रीय पातळीवर झालेल्या अनेक स्पर्धांमध्ये त्याने चमकदार कामगिरी केली आहे. तो ५५ किलोग्राम वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करतो.
संकेत खेलो इंडिया यूथ गेम्स २०२० आणि खेलो इंडिया यूनिवर्सिटी गेम्स २०२० या स्पर्धांचा चॅम्पियन राहिला आहे. तसेच त्याने ५५ किलो वजनी गटात राष्ट्रीय विक्रमही आपल्या नावे केला आहे. त्याने एकूण २५६ किलोग्राम वजन उचलले.
Sanket Sargar wins #TeamIndia's first medal at the Birmingham 2022 Commonwealth Games 🎆👏
He dedicates his 🥈 in men's 55kg weightlifting to all the brave Indians who fought for the country's independence 🇮🇳#EkIndiaTeamIndia | #B2022 pic.twitter.com/Jmpg8NrhHT
— Team India (@WeAreTeamIndia) July 30, 2022
बर्मिंघम कॉमनवेल्थसाठी कसा ठरला पात्र
संकेतने मागच्या वर्षी पटियाला येथे झालेल्या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. तसेच त्याने २०२१मध्ये ताशकंद येथे झालेल्या चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक पटकावले होते. तो यावर्षीच्या कॉमनवेल्थ स्पर्धेत सहभागी होणारा भारताचा युवा वेटलिफ्टर आहे.
तीन वेळेच्या राष्ट्रीय चॅम्पियन २१ वर्षीय संकेतच्या नावावर राष्ट्रीय आणि कॉमनवेल्थमध्ये २५६ किलोग्राम वजन उचलण्याचा विक्रम आहे. त्याने सिंगापूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंगमध्ये हा पराक्रम केला. यामुळेच तो बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्ससाठी पात्र ठरला. तसेच त्याने खेलो इंडिया युथ गेम्समध्ये सुवर्ण पदक पटकावले होते.
शेवटच्या दोन प्रयत्नात जखमी झाल्याने हुकले कॉमनवेल्थ गेम्सचे सुवर्ण
कॉमनवेल्थ गेम्समध्ये दुसऱ्या फेरीच्या शेवटच्या दोन प्रयत्नात संकेत जखमी झाला होता. त्याने या फेरीत १३९ किलोग्रामचे वजन उचलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो ते उचलू शकला नाही आणि तो जखमी झाला. लगेच मेडिकल पथकाने त्याच्यावर योग्य ते उपचार केले. नंतर तो तिसऱ्या प्रयत्नासाठी तयार झाला.
तिसऱ्या प्रयत्नातही त्याने पुन्हा एकदा १३९ किलोग्रामचे वजन उचलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दुखापतीमुळे पुन्हा एकदा अपयश आल्याने त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
𝙂𝙧𝙞𝙩. 𝙋𝙖𝙞𝙣. 𝙂𝙡𝙤𝙧𝙮. 👊
Sanket Sargar refused to give up even after hurting his right elbow on the second clean and jerk lift 💪
Terrific commitment from the 21-year-old @birminghamcg22🥈medallist 👏#EkIndiaTeamIndia | #B2022 | #TeamIndia pic.twitter.com/8IND1SEqi0
— Team India (@WeAreTeamIndia) July 30, 2022
ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी करण्याचे स्वप्न
संकेत आता आपल्या वडिलांना अधिक कष्ट करताना पाहू शकत नाही. नुकतेच त्याने एका मुलाखतीत म्हटले, “मी जर सुवर्ण पदक जिंकले तर वडिलांची मदत करणार आहे. त्यांनी माझ्यासाठी खूप मेहनत केली आहे. यामुळे मी त्यांनी आता आंनदी पाहू इच्छितो.” तसेच त्याचे लक्ष्य पॅरीस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी करण्याचे आहे.
गोल्ड कोस्ट येथे २०१८मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत सतीश शिवलिंगम आणि आर वेंकट राहुल यांनी सुवर्ण पदक जिंकले होते. संकेतही सुवर्ण पदक जिंकणार अशी अपेक्षा होती, मात्र शेवटच्या फेरीत दुखापतीमुळे त्याचे सुवर्ण पदक जिंकण्याचे स्वप्न भंग झाले. कॉमनवेल्थ गेम्समध्ये वेटलिफ्टिंगला सर्वप्रथम १९५०मध्ये समाविष्ट करण्यात आले होते. तेव्हापासून हा या स्पर्धेतील खेळाचा भाग राहिला आहे.
भारताचे हे कॉमनवेल्थ गेम्स २०२२मधील पहिले पदक ठरले आहे. तर भारताला या स्पर्धेत अजून पदके मिळण्याची आशा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अश्विनने घेतली कार्तिकची फिरकी! म्हटला, ‘एकेकाळी ब्रायन लारासोबत खेळणारा…’
‘आता क्रिकेटपटूही वापरू लागलेत चायनीज साहित्य?’, व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
ब्रेकिंग! सांगलीच्या संकेत सरगरने मिळवले देशासाठी पहिले मेडल