भारतातील सर्वात मोठी टी20 स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीला मंगळवारी (11 ऑक्टोबर) सुरुवात झाली. भारतातील विविध शहरात सुरू झालेल्या या स्पर्धेत पहिल्या दिवशी एलिट क गटात कर्नाटक विरुद्ध महाराष्ट्र असा सामना रंगला. सर्वांच्या अगदी अपेक्षांच्या विरुद्ध झालेल्या या सामन्यात कर्नाटकने महाराष्ट्राला 99 धावांनी पराभूत करत स्पर्धेत विजयी सलामी दिली.
Karnataka Won by 99 Run(s) #KARvMAH #SyedMushtaqAliT20 Scorecard:https://t.co/dVgresFoMr
— BCCI Domestic (@BCCIdomestic) October 11, 2022
मोहली येथे झालेल्या या सामन्यात महाराष्ट्राचा कर्णधार सत्यजित बच्छावने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा हा निर्णय भारतीय संघासाठी खेळलेल्या देवदत्त पडिक्कलने चुकीचा ठरवला. त्याने महाराष्ट्राच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढली. केवळ 62 चेंडूवर 14 चौकार व 6 षटकार ठोकत त्याने नाबाद 124 धावांची खेळी केली. कर्णधार मनीष पांडेने 50 तर मयंक अगरवालने 28 धावांचे योगदान दिले. या सर्वांच्या खेळामुळे कर्नाटकने महाराष्ट्रासमोर 216 धावांचे आव्हान उभे केले.
या आव्हानाचा पाठलाग करताना महाराष्ट्राचा संघ कोठेच दिसला नाही. नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड व राहुल त्रिपाठी यांच्या अनुपस्थितीत खेळत असलेल्या महाराष्ट्र संघाचे सर्वच प्रमुख फलंदाज एकेरी धावसंख्येवर माघारी परतले. अष्टपैलू दिव्यांग हिंगणेकरने सातव्या क्रमांकावर येत 47 तर शमशुझमा काझीने 28 धावा केल्या. कर्नाटकच्या नियंत्रित गोलंदाजीमुळे महाराष्ट्र संघ केवळ 116 धावा करू शकला.
दिवसातील अन्य सामन्यात मुंबईने दुबळ्या मिझोरामचा 9 गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली. धवल कुलकर्णी, तनुष कोटीयान व शम्स मुलानी यांनी मिझोरामचा डाव केवळ 98 भावांवर गुंडाळला. प्रत्युत्तरात, पृथ्वी शॉ (55) व अमन खान (39) यांनी आक्रमक फटकेबाजी करत 10.3 षटकात संघाला 9 गड्यांनी विजय मिळवून दिला. या व्यतिरिक्त दिल्ली, केरळ, बडोदा, उत्तर प्रदेश व हरियाणा या संघांनी देखील विजय मिळवत स्पर्धेची सुरुवात केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सिराज-सुंदरनंतर कुलदीप शो! यादवसाठी दुसऱ्या क्रमांकाचा ‘वनडे स्पेशल’ संघ दक्षिण आफ्रिका, पहिल्या…
कार्तिकनंतर ‘हा’ असणार टीम इंडियाचा फिनिशर? संघ व्यवस्थापनाने आताच दिली जबाबदारी
कॅप्टन रोहितचा संघ टी20 वर्ल्डकपनंतर ‘या’ संघाच्या दौऱ्यावर जाणार, पाहा संपूर्ण स्केड्युल