सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत केरळविरुद्ध खेळताना महाराष्ट्र संघाने 40 धावांनी विजय मिळवला. मंगळवारी (18 ऑक्टोबर) खेळल्या गेलेल्या या सामन्यात महाराष्ट्र संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. त्याने प्रथम फलंदाज आणि नंतर यष्टीरक्षकाच्या भूमिकेत स्वतःची गुणवत्ता दाखवून दिली. केरळ संघाचा कर्णधार संजू सॅमसन याला ऋतुराजने दाखवलेल्या चपळाईमुळे स्वस्तात विकेट गमवावी लागली. ऋतुराजची स्टंपिंग पाहून चाहते एमएस धोनीसोबत त्याची तुलना करू लागले आहेत.
ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यष्टीरक्षकाच्या भूमिकेत संजू सॅमसन (Sanju Samson) याला ज्या पद्धतीने बाद करतो, त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांनी ऋतुराजची स्टंपिंग पाहून एमएस धोनी (MS Dhoni) आठवत आहे. व्हिडिओवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील येत आहेत. सॅमसन एक शॉट खेळम्यासाठी क्रीजच्या बाहेर पाट टाकला, पण चेंडू मात्र त्याच्या बॅठला लागू शकला नाही. यष्टीरक्षक ऋतुराजने मात्र यष्टीपाठी हा चेंडू कुठलीही चूक न करता पकडला आणि ऐन वेळी स्टंपिंगही केली. त्याचे यष्टीपाठील प्रदर्शन पाहून चेन्नई सुपर किंग्जचे अनेक चाहते प्रभावित झाले आहेत.
https://www.instagram.com/reel/Cj5DK7VvO01/?utm_source=ig_web_copy_link
अनेकांच्या मते ऋतुराज भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीप्रामाचे यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडू शकतो. असे असले तरी, ऋतुराज यष्टीरक्षाकी भूमिका केव्हापासून पार पाडू लागला, हे निश्चितपणे सांगता येणार नाही. आयपीएलमध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वातील सीएसकेसाठी खेळताना त्याने यष्टीरक्षकाच्या रूपात काही महत्वाचे धडे घेतले असू शकतात. ऋतुराज आयपीएल 2019 पासून धोनीच्या नेतृत्वात सीएसकेसाठी खेळत आहे. आयपीएल 2021 सीएसकेला विजेतपद मिळवून देण्यासाठी ऋतुराजची भूमिका महत्वाची होती.
दरम्यान, महाराष्ट्र आणि केरळ संघातील या सामन्याचा विचार केला, तर महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी केली. मर्यादित 20 षटकांमध्ये महाराष्ट्राने 4 विकेट्सच्या नुकसानावर 167 धावा केल्या. यामध्ये ऋतुराजने 68 चेंडूत 7 षटकार आणि 8 षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 114 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात केरळ संघ 20 षटकात 8 विकेट्सच्या नुकसानावर 127 धावा करू शकला. रोहन कुन्नुमल सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्याने 44 चेंडूत 58 धावांची खेळी केली. महाराष्ट्रासाठी सत्यजीत बाढवने तीन आणि अजीम काजीने 2 विकेट्स घेतल्या. राजवर्धन हंगरगेकर आणि शम्शुजामा काजी या दोघांनीही प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
जरा इकडे पाहा! प्रत्येक विमानतळावर सूर्यकुमार कसा काढतो फोटो? रोहितने नक्कलच करून दाखवली
क्रीझ सोडणाऱ्या फलंदाजाला बाद करणे बॉलर्सचा हक्कच! माजी हेडकोचचे मोठे विधान