दक्षिण आफ्रिका महिलांचा भारत (South Africa Tour India) दौरा सुरु आहे. पहिल्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारतानं दक्षिण आफ्रिकेला 3-0 ने मात दिली. परंतू आज शुक्रवार (28 जून) रोजी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये एकच कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतानं टाॅस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये उपकर्णधार स्म्रीती मानधनानं (Smriti Mandhana) पहिल्याच डावात शानदार शतक झळकावलं.
स्म्रीती मानधनानं (Smriti Mandhana) या सामन्यात 161 चेंडूत 149 धावांची धमाकेदार खेळी खेळली. यादरम्यानं तिनं 27 चौकार आणि 1 षटकार लगावला. आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात मानधनानं तिच्या कारकिर्दीतलं पहिलं शतक झळकावलं. तत्पूर्वी मानधनानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत सलग 2 शतकं झळकावली होती आणि दोन्ही सामन्यात तिला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता. त्यासोबतच मानधना सलग 2 शतकं झळकावणारी पहिली भारतीय महिला ठरली होती.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत मानधनाला मालिकावीर पुरस्कार देखील देण्यात आला होता. मानधनानं 3 सामन्यात 114.33च्या सरासरीनं 343 धावा ठोकल्या होत्या. त्यामध्ये तिनं 41 चौकारांसह 3 षटकार लगावले होते. यादरम्यान तिचा स्ट्राईक 103.94 राहिला होता. मानधनानं आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये एकदिवसीय सामन्यात 7 तर कसोटी सामन्यात 1 शतकं झळकावलं आहे.
शेवटच्या 4 सामन्यांध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध स्म्रीती मानधनाची कामगिरी
117 (127) (पहिला वनडे)
136 (120) (दुसरा वनडे)
90 (83) (तिसरा वनडे)
149 (161) (पहिली कसोटी)
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडिया फायनलसाठी बार्बाडोसला पोहोचली, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका रंगणार अंतिम सामना
इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात या स्टार खेळाडूला मिळालं ‘सर्वोत्तम क्षेत्ररक्षकचा’ पदक
रोहित शर्मासह राहुल द्रविडने केली विराट कोहलीची पाठराखण