बुधवारी (०३ ऑगस्ट) भारत विरुद्ध बार्बाडोस महिला संघात कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मधील दहावा सामना खेळला गेला. उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी दृष्टीने उभय संघांसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा होता. या करा अथवा मरा सामन्यात भारताची सलामीवीर स्म्रीती मंधाना हिने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. छोटेखानी खेळीनंतरही तिने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
बार्बाडोसविरुद्ध (Barbados vs India) सलामीला फलंदाजीला येत एका चौकाराच्या मदतीने ७ चेंडूत ५ धावा करून स्म्रीती (Smriti Mandhana) पायचित झाली. मात्र या छोट्या खेळीचाही तिला उपयोग झाला आहे. तिने या खेळीसह सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील आपल्या २००० धावा पूर्ण केल्या आहेत. स्म्रीतीच्या नावापुढे सलामीवीर (Most T20I Runs As Opener) म्हणून सध्या २००४ धावांची नोंद आहे.
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून २००० धावांचा आकडा गाठणारी स्म्रीती पहिली आणि एकमेव भारतीय महिला फलंदाज बनली आहे. तसेच एकूण पाहायचे झाल्यास, रोहित शर्मा याच्यानंतर आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ही अभूतपूर्व कामगिरी करणारी दुसरीच भारतीय सलामीवीरही बनली आहे. रोहितने सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्री. टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक २९७३ धावा केल्या आहेत. या दोघांव्यतिरिक्त आतापर्यंत कोणताही भारतीय सलामीवीर हा पराक्रम करू शकलेला नाही.
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय सलामीवीर-
२९७३ धावा- रोहित शर्मा
२००४ धावा- स्म्रीती मंधाना*
१७५९ धावा- शिखर धवन
१४०७ धावा- मिताली राज
१३९२ धावा- केएल राहुल
असे आहेत दोन्ही संघ-
भारतीय महिला संघ:
शेफाली वर्मा, स्म्रीती मंधाना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), तानिया भाटिया (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, राधा यादव, स्नेह राणा, मेघना सिंग, रेणुका सिंग, पूजा वस्त्राकर
बार्बाडोस महिला संघ:
डिएंड्रा डॉटिन, हिली मॅथ्यूज (कर्णधार), कायसिया नाइट (यष्टीरक्षक), किशोना नाइट, आलिया ऍलेने, त्रिशन होल्डर, अलिसा स्कॅंटलबरी, शकेरा सेलमन, शमिलिया कोनेल, शॉन्टे कॅरिंग्टन, शनिका ब्रूस
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsBAR: ‘करा वा मरा’ लढतीसाठी भारत सज्ज, ‘या’ गोलंदाजाचे पुनरागमन; पाहा प्लेइंग इलेव्हन
एशिया कप जिंकण्यासाठी कर्णधार रोहित लावणार जोर, असा असू शकतो तगडा भारतीय संघ






