भारतीय क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना ही मंगळवारी (18 जुलै) 27 वा वाढदिवस साजरा करत आहे. भारतीय संघात पदार्पण केल्यानंतर आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने तिने भारतीय संघासाठी योगदान दिले आहे. याच वाढदिवसाच्या दिवशी तिला एक खुशखबर मिळाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या नव्या वनडे फलंदाजी क्रमवारीत तिला फायदा झाला.
सध्या भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावरील पहिल्याच वनडे सामन्यात भारतीय संघाला पराभूत व्हावे लागले. असे असताना देखील स्मृतीला नव्या क्रमवारी फायदा झाला. एका स्थानाची प्रगती करत ती आता सहाव्या क्रमांकावर पोहचली आहे. तर, भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही दोन स्थानांच्या नुकसानीसह आठव्या क्रमांकावर घसरली.
गोलंदाजी क्रमवारीबाबत बोलायचे झाल्यास, भारतीय गोलंदाजांमध्ये राजेश्वरी गायकवाड ही पहिल्या दहा मध्ये असणारी एकमेव भारतीय गोलंदाज आहे. ती नवव्या स्थानी असून, अष्टपैलूंच्या क्रमवारीत दीप्ती शर्मा सातव्या क्रमांकावर आहे.
फलंदाजी क्रमवारीचा विचार केल्यास श्रीलंकेची चमारी अटापटू केवळ दोन आठवडे पहिल्या क्रमांकावर राहू शकली. ऑस्ट्रेलियाची कर्णधार बेथ मुनी हिने पुन्हा एकदा हे स्थान आपल्या नावे केले. ऑस्ट्रेलियाची नॅट सिव्हर या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी पोहोचली असून, अष्टपैलूंच्या क्रमवारीतील आपले पहिले स्थान तिने कायम राखले.
(Smriti Mandhana Earn 7th Spot In ICC ODI Batting Rankings Harmanpreet Slips)
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तान वनडे संघाला मोठी विश्रांती, 2023 विश्वचषकानंतर खेळाडू एक वर्षांच्या सुट्टीवर
वेस्ट इंडीजसाठी युवा स्पिनर करणार कसोटी पदार्पण! दुसऱ्या कसोटीसाठी संघाची घोषणा