पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. उभय संघात सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळला जात आहे. यानंतर पाकिस्तान संघ अफगाणिस्तान दौरा करणार आहे. त्यानंतर आशिया चषक खेळेल आणि त्यानंतर वनडे विश्वचषकासाठी तयार असेल. पण वनडे विश्वचषक संपल्यानंतर पुढचा एक वर्ष हा संघ एकही सामना खेळणार नाहीये.
पाकिस्तान क्रिकेट संघाचे (Pakistan Cricket Team) वार्षिक वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले. यात वनडे विश्वचषक 2023 (ICC ODI Worls Cup 2023) नंतर त्यांचा संघ पुढच्या एका वर्षात एकही वनडे सामना खेळणार नाहीये. म्हणजे भारतात खेळला जाणारा आगामी वनडे विश्वचषकात पाकिस्तान संघ वर्षातील शेवटचा वनडे सामना खेळेल. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच पीसीबीने नुकतीच रिवाइज्ड एफटीपीची घोषणा केली, ज्यात एकही वनडे सामना दिसत नाहीये.
मंगळवारी (18 जुलै) पीसीबीने अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून 2023-24 चे एफटीपी (आगामी वेळापत्रक) जाहीर केले. या वेळापत्रकात विश्वचषक 2023 नंतर त्यांचा संघ डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. त्यानंतर जानेवारी महिन्यातच पाच टी-20 सामन्यांची मालिका न्यूझीलंड संघाविरुद्ध खेळली जाईल. त्यानंतर एप्रिल महिन्यातही न्यूझीलंड आणि पाकिस्तानमध्ये पाच टी-20 सामन्यांची मालिका खेलली जाईल.
त्यानंतर मे महिन्यात पाकिस्तान संघ नेदरलँडविरुद्ध तीन टी-20 आंतरराष्ट्रीय, आयर्लंडविरुद्ध दोन टी-20 आणि इंग्लंडविरुद्ध चार टी-20 सामन्यांच्या मालिका खेळेल. जून 2024मध्ये पाकिस्तान संघ आयसीसी टी-20 विश्वचषक खेळणार आहे. हा विश्वचषक वेस्ट इंडीज आणि यूएईमध्ये आयोजित केला जाणार आहे. यार्षीचा विश्वचषक भारतात आणि आशिया चषक पाकिस्तानमध्ये होणार असल्यामुळे आधीच भारत आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आमने सामने आले आहे. या दोन प्रमुख स्पर्धांच्या यजमानपदावरून दोन्ही संघांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. अशातच वनडे विश्वचषक संपल्यानंतर पुढचा एक वर्षभरात एकही वनडे सामना न खेळणे, ही त्यांच्या वनडे संघासाठी भविष्यात अडचणीची ठरू शकते. (In the upcoming schedule of Pakistan, not a single ODI will be played in the next year)
महत्वाच्या बातम्या –
वेस्ट इंडीजमध्ये द्रविडची भेट घेणार अजित आगरकर! तयार होणार विश्वचषकाचा रोडमॅप
जेव्हा ‘द वॉल’ची बॅट घेऊन स्मृती उतरली होती मैदानात, झळकावले होते झंझावती द्विशतक