सध्या भारतीय महिला संघ कॉमनवेल्थ स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध संमीफायनल सामना खेलत आहे. या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला सार्थ ठरवत भारताची सलामीवीर फलंदाज स्म्रीती मंधाना हिने स्पर्धेतील वैयक्तिक दुसरी अर्धशतक झळकावले. तिने अवघ्या २३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. स्म्रीतीने या सामन्यात भारतीय संघाला धमाकेदार सुरुवात करून दिली आहे. स्म्रीतीच्या अर्शतकी आणि शेफालीच्या साथीने भारताने सामन्याच्या पहिल्या ७ षटकांत एकही विकेट न गमावता ७३ धावा जोडल्या आहेत.
FIFTY for #TeamIndia vice-captain @mandhana_smriti off just 23 balls 👏👏
Her 16th in T20Is.
Live – https://t.co/ex8lGZRthz #INDvENG #B2022 pic.twitter.com/9oufibcWtT
— BCCI Women (@BCCIWomen) August 6, 2022
स्म्रीतीने या महत्वाच्या सामन्यात ३२ चेंडूत ६१ धावा केल्या. यावेळी तिने ८ चोकार आणि ३ षटकार लगावले. तिच्या या खेळाच्या जोरवर भारतीय संघाने सामन्याच्या सुरुवातीलाच इंग्लंडच्या संघावर दबाव निर्माण केला. तिने शेफली वर्माला सोबत घेत पहिल्या विकेटसाठी ७६ धावा जोडल्या. मात्र, शेफाली बाद झाल्यानंतर तिने लगेचच आपली विकेट गमाली.
दरम्यान, स्म्रीतीने या सामन्यात केवळ २३ चेंडूत अर्धशतक झळकावत एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. भारतासाठी टी-२० महिला क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धतक झळकावणाऱ्यांच्या यादीत आता स्म्रीती पहिल्या स्थानावर विराजमान झाली आहे. या यादीत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरही स्म्रीतीचाच क्रमांक लागतो. तिने २०१४ साली न्यूझीलंडविरुद्ध २४ चेंडूत आणि इंग्लंडविरुद्ध २०१८ साली २५ चेंडूत सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले होते.
महिला आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात वेगवान अर्धशतक:
२३ चेंडू – स्म्रीती मंधाना विरुद्ध इंग्लंड, २०२२
२४ चेंडू – स्म्रीती मंधाना विरुद्ध न्यूझीलंड, २०१९
२५ चेंडू – स्म्रीती मंधाना विरुद्ध इंग्लंड, २०१८
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताला अंडर-१९ वर्ल्डकप जिंकवून देणारे कर्णधार आता आहेत तरी कुठे? एक तर झालायं निवृत्त
भारताची गोल्ड मेडलवर नजर! नाणेफेक जिंकत हरमनप्रीतने घेतला फलंदाजीचा निर्णय, पाहा प्लेइंग ११