न्यूझीलंडमध्ये सध्या आयसीसी महिला विश्वचषक २०२२ चा (ICC Women World Cup 2022) थरार सुरू आहे. शनिवारी (१२ मार्च) हॅमिल्टन येथे भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात विश्वचषकातील दहावा सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित ५० षटकात ८ बाद ३१७ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ ४०.३ षटकातच १६२ धावांवर गारद झाला. परिणामी भारताने १५५ धावांनी हा सामना जिंकला.
या सामन्यात भारताकडून धुव्वादार शतकी खेळी करणाऱ्या सलामीवीर स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) हिला सामनावीर पुरस्काराने सन्मानित (Player Of The Match Award) करण्यात आले. परंतु सामनावीर पुरस्कार घेताना तिने जी कृती केली, त्याने सर्वांची मने जिंकली आहेत.
स्म्रीतीने हरमनप्रीतसोबत सामनावीर पुरस्कार केला शेअर
वेस्ट इंडिजविरुद्धच्या या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय सलामीवीर स्म्रीतीने सर्वाधिक १२३ धावा केल्या. ११९ चेंडूंचा सामना करताना २ षटकार आणि १३ चौकारांच्या मदतीने तिने ही शानदार खेळी केली. तर तिच्याखेरीज भारताच्या वनडे संघाची उपकर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिनेही २ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने १०९ धावांची तुफानी शतकी खेळी केली. मात्र स्म्रीतीला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
𝗔 𝗧𝗼𝘂𝗰𝗵 𝗢𝗳 𝗖𝗟𝗔𝗦𝗦! 👏 👏@mandhana_smriti shares her Player of the Match award with fellow centurion & #TeamIndia vice-captain @ImHarmanpreet ! 🙌 🙌 #CWC22 | #WIvIND
Scorecard ▶️ https://t.co/ZOIa3KL56d pic.twitter.com/8REiQMSLke
— BCCI Women (@BCCIWomen) March 12, 2022
A good comeback after a defeat in the 2nd match. Incredibly proud of this team 😇✌️#CWC2022 #TeamIndia pic.twitter.com/BDgyqguOt2
— Smriti Mandhana (@mandhana_smriti) March 12, 2022
सामनावीर पुरस्कार स्विकारताना स्म्रीतीने खेळाडूवृत्ती दाखवत हरमनप्रीतसोबत हा (Smriti Shared Player Of Award With Harmanpreet) पुरस्कार शेअर केला. तिच्या या कृतीने अनेकांची मने जिंकली आहेत.
स्म्रीती मंधानाने दिली प्रतिक्रिया
वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामना विजयानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये स्म्रीती म्हणाली की, मला वाटते, शतक करणे आणि सामनावीर न निवडले जाणे, ही अशी गोष्ट आहे जी वास्तवात कोणत्याही खेळाडूला निराश करते. मला वाटते, आम्ही दोघींनी मिळून ३०० धावा बनवण्यात समान रूपाने योगदान दिले आहे. म्हणून मला वाटते की, सामनावीर पुरस्कार शेअर करणे आमच्यासाठी चांगले आहे. आम्ही दोघीही या पुरस्काराच्या दावेदार आहोत. मला विश्वास आहे की, आयसीसी आम्हाला अजून ट्रॉफी देईल. कारण त्यांच्याकडे तितके बजेटही आहे.