हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघ आज (19 डिसेंबर) नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीमध्ये तिसऱ्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजशी भिडणार आहे. ही मालिका 1-1 अशी बरोबरीत असून मालिकेतील निर्णायक सामना आज होणार आहे. या निर्णायक सामन्यात टीम इंडियाची स्टार सलामीवीर स्मृती मानधना हिला इतिहास रचण्याची संधी असणार आहे. पहिल्या दोन टी20 प्रमाणेच तिने तिसऱ्या सामन्यातही अर्धशतक झळकावले तर ती केवळ अर्धशतकांची हॅट्ट्रिकच पूर्ण करणार नाही तर तिच्या नावावर एक मोठा विश्वविक्रमही होईल.
हा विक्रम महिलांच्या टी20 मध्ये सर्वाधिक 50+ धावसंख्येचा आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या टी20 मध्ये स्मृती मानधनाने 62 धावांची इनिंग खेळून या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक अर्धशतक झळकावण्याचा विश्वविक्रमाची बरोबरी साधली होती. मात्र आज आणखी एका अर्धशतकासह ती सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही आपल्या नावावर करू शकते.
स्मृती मानधनाने तिच्या कारकिर्दीत 147 टी20 सामन्यांमध्ये 29 वेळा 50 धावांचा टप्पा ओलांडला आहे. जरी ती एकदाही तिहेरी आकडा गाठू शकली नसली तरी तिच्या नावावर 29 अर्धशतके आहेत. तर न्यूझीलंडची लिस्ट बेट्स 28 अर्धशतक आणि 1 शतकासह संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे.
मंधानाने आज आणखी एक अर्धशतक झळकावले तर ती 30व्यांदा 50 धावांचा टप्पा पार करेल आणि हा विश्वविक्रम आपल्या नावावर करेल.
महिला टी20 मध्ये सर्वाधिक 50+ धावा
स्मृती मानधना- 29
सूजी बेट्स – 29
बेथ मूनी – 25
स्टेफनी टेलर – 22
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत स्मृती मानधनाची बॅट आग ओकत आहे. या मालिकेत तिने आतापर्यंत खेळलेल्या 2 सामन्यात 58 च्या उत्कृष्ट सरासरीने 116 धावा केल्या आहेत. या मालिकेत अजून एकाही फलंदाजाला 100 धावांचा टप्पा गाठता आलेला नाही.
हेही वाचा-
BGT 2024 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज, टॉप-5 मध्ये 2 भारतीय
R Ashwin Retirement; अनोखा योगायोग, अनिल कुंबळेच्या शैलीत अश्विनची निवृत्ती!
“मला पाकिस्तानपेक्षा श्रीमंत व्हायचं आहे”, शोएब अख्तरचं हास्यास्पद वक्तव्य