भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फलंदाज स्म्रीती मंधाना हिला तिच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जाते. परंतु तिने मैदानावर वाद घातल्याचे फार क्वचितच पाहायला मिळाले आहे. भारतीय महिला क्रिकेटपटू सध्या वरिष्ठ महिला टी२० लीग खेळण्यात व्यस्त आहेत. या स्पर्धेतील रविवारी (२४ एप्रिल) झालेल्या महाराष्ट्र विरुद्ध राजस्थान सामन्यात मोठा विवाद पाहायला मिळाला. या सामन्यादरम्यान राजस्थानच्या गोलंदाजाने मंधानाला मंकडिंग पद्धतीने धावबाद केले, ज्यानंतर मंधाना मैदानावर राजस्थानच्या खेळाडूंशी भिडली.
राजस्थानविरुद्धच्या सामन्यात (Maharashtra vs Rajasthan) महाराष्ट्राचे पारडे जड दिसत होते. यादरम्यान राजस्थानच्या गोलंदाजाने मंधानाला (Smriti Mandhana) नॉन स्ट्राईकरवर धावबाद केले. त्यामुळे तिने राजस्थानच्या खेळाडूंशी वाद (Smriti Mandhana Sledging) घातला. मात्र तिसऱ्या पंचांनी तिला बाद दिले. महिला क्रिकेटमध्ये घडलेले हे प्रकरण सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
मंधाना ठरली मंकडिंगची शिकार
तर झाले असे की, राजस्थानचा संघ प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये ७ विकेट्सच्या नुकसानावर १०२ धावाच करू (Senior Womens T20 League) शकला. प्रत्युत्तराल राजस्थानच्या आव्हानाचा पाठलाग करताना मंधाना आणि एस शिंदेने महाराष्ट्र संघाला चांगली सुरुवात करून दिली. ८.१ षटकांनंतर महाराष्ट्र संघाची धावसंख्या ४६ इतकी होती. परंतु नवव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर वाद झाला.
शिंदे स्ट्राईकवर असताना राजस्थानच्या गोलंदाजाने चेंडू फेकण्यापूर्वी नॉन स्ट्राईकरवरील मंधाना खेळपट्टीच्या थोडी पुढे गेली. या संधीचा फायदा घेत गोलंदाज केपी चौधरीने चेंडू नॉन स्ट्राईकरवरील यष्ट्यांवर (Mankading Runout) मारला. यानंतर मैदानावरील वातावरण तापले. मंधानाने राजस्थान संघाच्या या कृतीचा विरोध केला. ती विरोधी संघातील खेळाडूंना यावरून बोलताना दिसली. राजस्थानच्या खेळाडूही तिच्या उत्तराला उत्तर देत होत्या. त्यामुळे हा निर्णय शेवटी तिसऱ्या पंचांकडे पाठवण्यात आला आणि त्यांनी मंधानाला धावबाद दिले.
https://twitter.com/krithika0808/status/1518097034401566720?s=20&t=0JP_3BDEDNOnOo55AGY2Ig
महाराष्ट्र संघाने जिंकला सामना
तिसऱ्या पंचांनी धावबाद करार केल्याने मंधानाला २८ धावांवर माघारी परतावे लागले. तिने ३० चेंडू खेळताना १ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने या धावा केल्या. मंधानाव्यतिरिक्त एस शिंदेने ३०, टीएस हसबनीसने नाबाद ३९ आणि एमआर मार्गेने नाबाद ५ धावा करत १८.१ षटकांमध्येच संघाला सामना जिंकून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
इकडे मुंबई इंडियन्स सलग ८ वी मॅच हरली अन् तिकडे रोहितची बाबर आझमशी तुलना सुरू झाली
‘मी देखील बेजबाबदार खेळलो,’ रोहितने मुंबईच्या सलग ८ व्या पराभावानंतर मान्य केली चूक
चेन्नईविरुद्ध २ धावा अन् शिखर गाठणार आयपीएलमधील मोठा पल्ला, केवळ विराटलाच जमलाय ‘तो’ विक्रम