इंग्लंडविरुद्धचा दुसरा टी20 सामना भारतीय संघाचा विस्फोटक सलामीवीर स्म्रीती मंधाना हिने गाजवला. स्म्रीतीने इंग्लंडच्या 143 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रौद्रावतार धारण केला आणि शानदार फलंदाजी करत डावाखेर नाबाद राहिली. तिच्या योगदानामुळे भारतीय संघाने 16.4 षटकातच 8 विकेट्सच्या फरकाने हा सामना जिंकला. स्म्रीती नेहमीच इंग्लंडसाठी कर्दनकाळ ठरली असल्याचे दिसते.
भारताकडून सलामीवीर स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) हिने प्रभावी खेळी केली. तिने 53 चेंडू खेळताना 149 च्या स्ट्राईक रेटने धावा काढल्या. 13 चौकारांच्या मदतीने तिने नाबाद 79 धावा केल्या. ही तिची इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक (Highest Individual Score Against England) ठरली आहे. याखेरीज ही इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारताकडून केलेली सर्वोच्च वैयक्तिक खेळीही आहे.
विशेष म्हणजे, इंग्लंडविरुद्ध टी20 क्रिकेटमधील पहिल्या 3 सर्वोच्च वैयक्तिक खेळी स्म्रीतीच्याच नावावर आहेत. यापूर्वी 25 मार्च 2018 मध्ये तिने इंग्लंडविरुद्ध 76 धावा केल्या होत्या. तर तिसरी सर्वोच्च वैयक्तिक खेळी तिने 14 जुलै 2021 ला नोंदवली होती.
इंग्लंडच्या महिला संघाविरुद्ध भारताकडून टी20त सर्वोच्च वैयक्तिक खेळी
79* – स्म्रीती मंधाना (सप्टेंबर 2022)
76 – स्म्रीती मंधाना (मार्च 2018)
70 – स्म्रीती मंधाना (जुलै 2021)
66* – रुमेली डार (ऑगस्ट 2006)
62* – स्म्रीती मंधाना (मार्च 2018)
61 – स्म्रीती मंधाना (ऑगस्ट 2022)
58 – स्म्रीती मंधाना (मार्च 2019)
https://twitter.com/BCCIWomen/status/1569779306154557441?s=20&t=Rq4mbAjEefPdLZ0fyAPiOg
भारताकडून सर्वाधिक धावा करणारी तिसरी फलंदाज
याखेरीज स्म्रीती महिला आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्म्रीतीचा हा 94 वा आंतरराष्ट्रीय टी20 सामना होता. या 94 सामन्यात तिने 2294 धावा केल्या आहेत. यामध्ये तिच्या 17 अर्धशतकांचा समावेश आहे. या यादीत भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर अव्वलस्थानी आहे. हरमनप्रीतने 131 सामने खेळताना 1 शतक आणि 8 अर्धशतके करत 2597 धावा केल्या आहेत. तर माजी कर्णधार मिताली राज हिचा या यादीत दुसरा क्रमांक लागतो. मितालीने 89 टी20 सामने खेळताना 17 अर्धशतकांच्या मदतीने 2364 धावा जोडल्या होत्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्राची पोरगी इंग्लंडच्या पठ्ठ्यावर भारी! स्म्रीतीने बड्या विक्रमात जोस बटलरला टाकले मागे
अब आयेगा मजा! स्म्रीतीच्या झंझावातापुढे उडाले इंग्लंड, टी20 मालिका 1-1ने बरोबरीत
पुन्हा एकदा वर्ल्डकप गाजवायला नामीबियाचा संघ जाहीर; आरसीबीसाठी खेळलेला अष्टपैलूही संघात






