स्मृती मानधना उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेत खूप धावा करत आहे. आत्तापर्यंत या मालिकेतील 2 सामने खेळले गेले असून मनधानाने दोन्ही सामन्यात अर्धशतके झळकावली आहेत. दुसऱ्या टी20 सामन्यात भारतीय महिला संघाला वेस्ट इंडिजविरुद्ध 9 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. मानधना व्यतिरिक्त भारताचे बाकीचे फलंदाज या सामन्यात वाईटरित्या फ्लॉप ठरले. याच कारणामुळे संघाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात हरमनप्रीत कौरच्या जागी स्मृती मानधनाने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली. या सामन्यात तिने 41 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकारासह 62 धावा केल्या. हे तिचे टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 29वे अर्धशतक आहे. यासह, ती महिला टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकं झळकावणारी खेळाडू बनली आहे आणि तिने न्यूझीलंडच्या सुझी बेट्सचा विश्वविक्रम मोडला आहे. सुझी बेट्सने महिला टी20 क्रिकेटमध्ये 28 अर्धशतके झळकावली आहेत. महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतके झळकावण्याच्या बाबतीत मनधानाने आता सर्व खेळाडूंना मागे टाकले आहे.
महिला टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके झळकावणारे खेळाडू:
स्मृती मानधना (भारत)- 29
सुझी बेट्स (न्यूझीलंड) – 28
बेथ मुनी (ऑस्ट्रेलिया) – 23
स्टॅफनी टेलर (वेस्ट इंडिज) – 22
सोफी डिव्हाईन (न्यूझीलंड) – 21
28 वर्षीय स्मृती मानधना हिने 2013 मध्ये भारतीय संघाकडून टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून ती टीम इंडियाच्या फलंदाजीच्या क्रमातील महत्त्वाची दुवा बनली. तिने आतापर्यंत भारतासाठी 147 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3684 धावा केल्या आहेत. महिला टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ती दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे.
भारत विरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार हेली मॅथ्यूजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर टीम इंडियाने 20 षटकांत 159 धावा केल्या. ज्यात मनधानाने भारतासाठी अर्धशतक झळकावले. तर रिचा घोषने 32 धावांची खेळी केली. या खेळाडूंव्यतिरिक्त इतर खेळाडूंना चांगली कामगिरी करता आली नाही. यानंतर वेस्ट इंडिजकडून हेली मॅथ्यूजने 85 धावा करत संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला.
हेही वाचा-
वेस्ट इंडिजचा कमबॅक, टीम इंडियाचा दारुण पराभव; मालिका बरोबरीत
IND vs AUS; गाबा कसोटीत शानदार खेळी केल्यानंतर, केएल राहुल म्हणाला…
मुंबईमध्ये येताच या खेळाडूचे नशीब उजळले, किवीसंघाचे कर्णधारपद मिळाले