यावर्षी भारतीय महिला संघाने मायदेशात आणि परदेशात जाऊनही चांगली कामगिरी केली आहे. या संघातील फलंदाजही चांगल्याच फॉर्ममध्ये होते. दरम्यान याच संघातील अनुभवी फलंदाज स्म्रीती मंधाना हिचा (Smriti Mandhana) यावर्षी टी२० क्रिकेटमध्ये जलवा पाहायला मिळाला होता. याच कामगिरीच्या जोरावर तिला आयसीसीकडून मोठ्या पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे.
भारतीय संघासाठी डावाची सुरुवात करणाऱ्या स्म्रीती मंधानाला गुरुवारी (३० डिसेंबर) तीन क्रिकेटपटूंसह ‘आयसीसी महिला टी२० प्लेयर ऑफ द इयर’ (icc women’s T20 Cricketer of the year) पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे. ज्यामध्ये स्म्रीती मंधानासह इंग्लंड संघाची खेळाडू टॅमी ब्युमॉन्ट (Tammy beaumont), नॅट सायव्हर (Nat sciver) आणि आयर्लंडची गॅबी लुईस (Gabby Luis) यांचा समावेश आहे.
स्म्रीती मंधानाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर तिने यावर्षी ९ टी२० सामने खेळले, ज्यामध्ये तिने ३२ च्या सरासरीने २५५ धावा केल्या आहेत. यादरम्यान तिने २ अर्धशतक झळकावले आहेत. भारतीय संघातील पुरुष आणि महिला खेळाडूंमध्ये स्मृती मंधाना टी२०क्रिकेट प्रकारात सर्वोत्तम खेळाडूसाठी नामांकन मिळवणारी एकमेव खेळाडू आहे. यावर्षी भारतीय पुरुष संघातील एकाही खेळाडूला टी२० प्रकारात नामांकन मिळालं नाहीये. विजेत्या खेळाडूंची घोषणा जानेवारी महिन्यात करण्यात येणार आहे.
स्म्रीती मंधानाने यावर्षी टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध अर्धशतके झळकावली आहेत. आयर्लंडच्या गॅबी लुईसबद्दल बोलायचं झालं तर, तिने १० टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तिने ४१ च्या सरासरीने ३२५ धावा केल्या आहेत. यादरम्यान तिने एक शतक आणि एक अर्धशतक देखील झळकावले. या अप्रतिम फलंदाजीमुळे आयर्लंड संघाला २ मालिका जिंकण्यात यश आले होते. ती टी२० क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी आयर्लंडची पहिली खेळाडू ठरली आहे.
अधिक वाचा – वुमेन्स बिग बॅश लीगमध्ये स्म्रीती मंधनाचा शतकी धमाका! ‘असा’ पराक्रम करणारी पहिलीच भारतीय
इंग्लंडच्या टॅमी ब्युमॉन्ट आणि नॅट सायव्हर यांचाही ४ खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. ब्युमॉन्टने ९ सामन्यात ३४ च्या सरासरीने ३०३ धावा केल्या. यादरम्यान तिने ३ अर्धशतके झळकावली. तर सायव्हर ९ सामन्यात १९ च्या सरासरीने १५३ धावा केल्या. याशिवाय २० च्या सरासरीने तिने १० गडी देखील बाद केले.
महत्वाच्या बातम्या :
रणजी ट्रॉफीसाठी तमिळनाडू संघाच्या नेतृत्त्वाची धुरा विजय शंकरकडे, ३ नव्या चेहऱ्यांनाही संधी
हे नक्की पाहा :