भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना हिने महत्वाचा निर्णय घेतला आहे. बीग बॅश लीगच्या आगामी हंगामात स्मृती खेळणार नाहीये. देशांतर्गत क्रिकेटच्या आघामी हंगामात खेळण्यासाठी तिने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. सोबतच या निर्णयामुळे तिला व्यस्त वेळापत्रकातून काही काळ विश्रांती देखील मिळणार आहे.
तत्पूर्वी स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिने बीग बॅश लीग म्हणजेच बीबीएलच्या (BBL) मागच्या वर्षीच्या हंगामातून देखील माघार घेतली होती. तिने आवले व्यस्त वेळापत्रक आणि भारतीय संघासाठी अधिक चांगल्या प्रदर्शन करण्यावर लक्ष देण्याचे कारण देत हा निर्णय घेतला होता. अशातच आता बातम्या येत आहेत की, स्मृती मंधाना महिला बीबीएल 2023मधूनही माघार घेत आहे. तिने यावर्षीही महिला बीबीएलच्या ड्राफ्टमध्ये आपले नाव दिले नाही. भारताच्या 18 महिला खेळाडूंसह या ड्राफ्टमध्ये जगभरातील 122 महिला खेळाडूंची नावे आहेत.
स्मृती मंधाना बीबीएलमध्ये खेळण्याऐवजी देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्र संघासाठी खेळताना दिसू शकते. देशांतर्गत क्रिकेटचा आगामी हंगाम 19 ऑक्टोबर रोजी सुरू होणार असून 26 जानेवारीपर्यंत खेळला जाणार आहे. यादरम्यानच्या काळाताच महिला बीबीएल देखील खेळवली जाणार आहे.
दरम्यान, स्मृतीने नुकतीच पार पडलेली द हंड्रेड टॉर्नामेंट गाजवली. स्मृती प्रतिनिधित्व करत असलेल्या साउदर्न ब्रेव संघाने विजितेपद पटकावले. ती आतापर्यंत खेलल्या गेलेल्या 8 बीबीएल हंगामांपैकी 3 हंगामांमध्ये खेळली आहे. या हंगामांमध्ये स्मृतीने ब्रिस्बेन हीट, होबार्ट हरिकेंस आणि शिडनी थंडर्स यांचे प्रतिनिधित्व केले. त्याचसोबत यावर्षी नव्याने सुरू झालेल्या महिला इंडियन प्रीमियर लीगमध्ये स्मृती सर्वात महागडी खेळाडू देखील ठरली. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने तिला संघात घेण्यासाठी 3.40 कोटी रुपये खर्च केले होेत. असे असले तरी, आरसीबीचे पहिल्या महिला आयपीएलमधील प्रदर्शन समाधानकारक नव्हते. स्मृतीची बॅट देखील शांतच पाहायला मिळाली होती. (Smriti Mandhana refused to play in a special T20 league! Will play an important series in the India)
महत्वाच्या बातम्या –
आशिया चषकात सर्वाधिक विकेट्स घेणारे 5 ऍक्टिव्ह प्लेअर्स, ‘हा’ भारतीय फिरकीपटू टॉपवर
राहुलच्या अनुपस्थितीत संजू सॅमसनला संधी मिळणार, आशिया चषकात काय निर्णया घेणार संघ व्यवस्थापन?