भारताची दिग्गज महिला क्रिकेटपटू स्मृती मंधानानं इतिहास रचला आहे. मंधाना तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक धावा बनवणारी महिला क्रिकेटपटू बनली आहे. तिनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात 127 चेंडूत 117 धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 120 चेंडूत 136 धावांची खेळी खेळली. यानंतर स्मृतीनं तिसऱ्या सामन्यात 90 धावा ठोकत हा रेकॉर्ड आपल्या नावे केला,
तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या महिला क्रिकेटपटू
स्मृती मंधाना – 343 धावा विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2024
लौरा वोल्वार्ड्ट – 335 धावा विरुद्ध श्रीलंका, 2024
हेली मॅथ्यूज – 325 विरुद्ध पाकिस्तान, 2024
सिद्रा अमीन – 277 धावा विरुद्ध आयर्लंड, 2022
नेट सायवरब्रंट – 271 धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2023
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय महिलांनी रविवारी दक्षिण आफ्रिकेवर 6 गडी राखून विजय मिळवत मालिका 3-0 अशी जिंकली. या सामन्यात मंधाना मालिकेतील सलग तिसरं शतक ठोकण्यापासून चुकली. तिनं 83 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीनं 90 धावा ठोकल्या. दक्षिण आफ्रिकेला 215 धावांवर रोखल्यानंतर भारतीय संघानं 40.4 षटकांत 4 गडी गमावून लक्ष्य गाठलं.
स्मृती मंधानानं पहिल्या विकेटसाठी शेफाली वर्मा (25) सोबत 61, तर दुसऱ्या विकेटसाठी प्रिया पूनिया (28) सोबत 62 धावांची भागिदारी केली. यानंतर तिनं तिसऱ्या विकेटसाठी कर्णधार हरमनप्रीत कौर (42) सोबत 48 धावा जोडल्या.
तत्पूर्वी, कर्णधार लॉरा वोलमार्ट (61) च्या आक्रमक अर्धशतकानंतरही दक्षिण आफ्रिकेची टीम मोठा स्कोर उभारू शकली नाही. वोलमार्टनं पहिल्या विकेटसाठी तॅजमिन ब्रिट्स (38) सोबत 102 धावांची भागिदारी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
टी20 विश्वचषकात 2007 पासून चालू आहे हा ट्रेंड, यंदाही झाला खरा!
दक्षिण आफ्रिकेचा यजमानांना दे धक्का! सेमीफायलमध्ये मारली धडक
बाबर आझमची नाचक्की! पाकिस्तानच्या संसदेत झाला ट्रोल, खासदारानं घेतली खूप मजा