---Advertisement---

‘लग्नासाठी कसा मुलगा पाहिजे, करोडपती की…?’, चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर स्मृती मंदानाने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

On: गुरूवार, जून 24, 2021 1:08 AM
---Advertisement---

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मंधनाचे सोशल मीडियावर भरपूर चाहते आहेत. स्मृती चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. तिच्या चाहत्यांना हा प्रश्न नेहमी पडतो की, स्मृती आपला रोजचा दिवस कसा घालवते. याच दरम्यानच स्मृती मंधनाच्या खाजगी आयुष्या संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यामध्ये स्मृती तिच्या दररोजचे काम करताना दिसून येत आहे. त्यासोबतच स्मृती मंधनाने सांगितले की, तिला लग्नासाठी कसा मुलगा पाहिजे. (Smriti Mandhana’s video of Indian women’s cricket team went viral)

आयुष्यातील साथीदाराबद्दल स्मृतीने अशी दिली प्रतिक्रिया
भारतीय महिला संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये स्मृती मंधना फोनवर प्रश्न वाचत असलेली दिसत आहे. स्मृतीला एका चाहत्याने प्रश्न विचारला की, “तुला लग्नासाठी कसा मुलगा आवडतो. ज्याच्याकडे जास्ती पैसे आहेत असा की, असा मुलगा ज्याची क्रेझ असेल.”

हा प्रश्न वाचताच स्मृतीच्या चेहऱ्यावर हसू आले आणि म्हणाली की, “काय आहे हे?”

A Day in the Life of Smriti Mandhana

स्मृती मंधना भारतीय संघाचा एक महत्त्वाचा भाग
स्मृती मंधनाने बांगलादेशच्या महिला संघाविरुद्ध टी-20 सामन्यांमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. यानंतर त्याच वर्षी स्मृतीने एकदिवसीय कारकिर्दीचा पहिला सामना देखील खेळला होता. स्मृतीच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिला 2014 मध्ये इंग्लंड विरुद्ध पहिल्यांदा कसोटी क्रिकेटमध्ये खेळण्याचा संधी मिळाली.

स्मृती मंधना सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. पहिल्या कसोटी सामन्यामध्ये स्मृतीने इंग्लंड विरुद्ध उत्कृष्ट फलंदाजी केली होती. महिला खेळाडूबद्दल बोलायचे झाले, तर ती खूप लोकप्रिय आहे. स्मृतीचे मजेशीर व्हिडिओ नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

महत्त्वाच्या बातम्या-

सचिन ठरला २१ व्या शतकातील सर्वात महान कसोटी फलंदाज; ‘या’ दिग्गजाला मागे टाकत पटकावला मान

कोहलीचं ‘विराट’ मन! कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळत असलेल्या वॉटलिंगला भारताच्या कर्णधाराकडून खास शुभेच्छा

…अन् चाहत्यांचे सेलिब्रेशन क्षणात बदलले निराशेत, पाहा कॅमेरामनने टिपलेला भन्नाट व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---