पुणे। संबलपूर आणि लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ संघांनी सफाईदार विजयाची नोंद करत येथे सुरु असलेल्या एसएनबीपी २८व्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पिंपरीमधील नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी मैदानावर आज झालेल्या सामन्यात लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ संघाने पंजाबी विद्यापीठ, पतियाळा संघावर ३-१ असा विजय मिळविला. संबलपूर विद्यापीठ संघाने गुरुनानक देव विद्यापीठ संघाचा ३-१ अशाच फरकाने पराभव केला.
लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ संघाच्या विजयात भूषण शर्मा (२६वे मिनिट), धमी बॉबी सिंग (३२वे मिनिट) आणि हुंडाल अरायजीत सिंग (३८वे मिनिट) यांनी गोल केले. पराभूत पंजाबी विद्यापीठ संघाकडून केवळ मायकेल टोपणो यालाच गोल करता आला. त्यापूर्वी झालेल्या सामन्यात नितेशच्या (४थे आणि ५९वे मिनिट) दोन गोलच्या जोरावर संबलपूरचा विजय साकार झाला. त्यांचा अन्य एक गोल ४३व्या मिनिटाला प्राजुक्त नाग याने केला. गुरुनानक देव संघाकडून एकमात्र गोल सरबजींदर सिंग याने ४४व्या मिनिटाला केला.
सामन्याच्या चौथ्या मिनिटाला नितेशने गोल करून संघाचे खाते उघडले. त्यांची ही आक्रमक सुरवात गुरुनानक देव संघाला झेपली नाही. संबलपूरच्या खेळाडूंनी आपल्या खेळातील लय कायम राखताना मंध्यतराला १-० अशी आघाडी कायम राखली. उत्तरार्धात ४३व्या मिनिटाला प्राजुक्तने संबलपूर संघाची आघाडी वाढवली. सरबजींदर सिंग याने ४४व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावताना पिछाडी भरून काढली. त्यानंतर पुढे सामना दोघांनी अत्यंत सावधपणाने खेळला. अमृतसरचा गोलरक्षक पुढे आल्याची संधी साधताना नितेशने रिव्हर्स स्कूप करून जबरदस्त गोल करून संघाची आघाडी वाढवली. गुरुनानक देव संघाच्या खेळाडूंनी गोल करण्याच्या संधी जरुर निर्माण केल्या. पण, त्याचा त्यांना फायदा उठवता आला नाही. त्यांच्या जमनजीत सिंग याला मिळाळेल्या पेनल्टी स्ट्रोकवरही गोल करण्यात अपयश आले. त्याचा प्रयत्न संबलपूरचा गोलरक्षक दिलीप एस.ए. याने परतवून लावला.
निकाल –
संबलपूर विद्यापीठ, संबलपूर ३ (नितेश ४थे, ४३वे मिनिट, प्राजुक्त नाग ५९वे मिनिट) वि.वि. गुरुनानक देव विद्यापीठ,अमृतसर १ (सरबजींदर सिंग ४४वे मिनिट) मध्यंतर १-०
लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ, फगवाडा ३ (भूषण शर्मा २६वे मिनिट, धमी बॉबी सिंग ३२वे मिनिट, हुंडाल अरायजीत सिंग ३८वे मिनिट) वि.वि. पंजाबी विद्यापीठ, पतियाळा १ (मायकेल टोपनो २५वे मिनिट) मध्यंतर १-१
शुक्रवारी होणाऱ्या उपांत्य लढती
– व्हीबीएसपी विद्यापीठ वि. सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ दुपारी १२.३० वा.
– संबलपूर विद्यापीठ, संबलपूर वि.वि. लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ, फगवाडा दु.२.३० वा
महत्त्वाच्या बातम्या –
Video: कमिन्स बनला ‘थॉर’! खेळपट्टी हातोड्याने ठोकताना दिसला ऑसी कर्णधार, पण का?
व्हीबीएसपी जौनपूर आणि पुणे विद्यापीठ उपांत्य फेरीत