ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर असून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिले दोन्ही सामने अनिर्णित राहिले आहेत. यातील कराची येथे झालेला दुसरा कसोटी सामना रोमांचक झाला. या सामन्याच्या अखेरपर्यंत पारडे कधी ऑस्ट्रेलियाच्या बाजूने जड होत होते, तर कधी पाकिस्तानकडे झुकत होते. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स सामना सुरू असताना मधेच खेळपट्टीवर हातोड्याने ठोकताना दिसला होता. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला.
ही गोष्ट पाकिस्तान संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना घडली. डावाच्या ५३ व्या षटकात ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरॉन ग्रीन गोलंदाजी करत होता. हे षटक सुरू असताना कमिन्स (Pat Cummins) गोलंदाज गोलंदाजी करतो, त्या ठिकाणी खेळपट्टी हातोड्याने ठोकताना दिसला. हा व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना त्यांनी कमिन्सला थॉरची उपमाही दिली आहे.
खरंतर खेळपट्टी सपाट नसल्याने त्रास होत असल्याने कमिन्सने हातोडी मागवली होती (hammers pitch) आणि खेळपट्टी नीट करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याचे संघसहकारी आणि पंच त्याच्या आजूबाजूला होते. खेळपट्टीत सुधारणा करण्याचे हे काम साधारणत: ग्राऊंड्समनचे असते (performs groundsmen duties). पण, या सामन्यादरम्यान कमिन्सने ही भूमिका निभावली.
https://twitter.com/TheRealPCB/status/1503725008954314759
त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने देखील असेच खेळपट्टीवर हातोडीने ठोकताना दिसला होता.
https://twitter.com/TheRealPCB/status/1504109884098457605
दुसरा सामना अनिर्णित
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Pakistan vs Australia) पहिला डाव ९ बाद ५५६ धावांवर डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने १६० धावा केल्या, तर स्टीव्ह स्मिथने ७२ आणि ऍलेक्स कॅरेने ९३ धावांची अर्धशतकी खेळी केली. पाकिस्तानकडून फहिम अश्रफ आणि साजिद खानने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. पण नंतर पाकिस्तानचा पहिला डाव १४८ धावांवरच संपुष्टात आला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी मिळाली.
पाकिस्तानकडून दुसऱ्या डावात कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक ३६ धावांची खेळी केली. तर ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्कने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव २ बाद ९७ धावांवर घोषित केला.
त्याचबरोबर पाकिस्तानला ५०६ धावांचे आव्हान दिले. पाकिस्तानकडून ५०६ धावांचा पाठलाग करताना बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानने शतकी खेळी केली. आझमने १९६ धावा केल्या, तर रिझवानने नाबाद १०४ धावांची खेळी केली. तसेच अब्दुल्ला शफिकने ९६ धावांची खेळी केली. त्यामुळे पाकिस्तानने अखेरच्या दिवसाच्या शेवटच्या षटकापर्यंत ७ बाद ४४३ धावा केल्या. त्यामुळे हा सामना अनिर्णित राहिला.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: मैदानात ‘थाला’च नंबर १, पण घरी कोणाची चालते दादागिरी? चाहत्याच्या गुगलीवर धोनीचा सिक्सर
दक्षिण आफ्रिकी गोलंदाजाच्या यॉर्करने उडवल्या किवी कर्णधाराच्या दांड्या; शतकही हुकलं, VIDEO VIRAL
‘तुझ्या आयुष्यात दुसरं कुणी आहे का?’, अश्विनला चहलचा प्रश्न; वाचा काय आहे भानगड





