पुणे 2 सप्टेंबर 2023 – यजमान एसएनबीपी अकादमी संघाने 16 वर्षांखालील एसएनबीपी राष्ट्रीय स्तरावरील हॉकी स्पर्धेला झकास सुरुवात करताना ऑलिम्पियन भास्करन हॉकी अकादमी संघावर 9-0 असा विजय मिळविला.
म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरु असलेल्या या स्पर्धेतील अन्य सामन्यात आर. के. रॉय अकादमी, ध्यानचंद अकादमी, फ्लिकर ब्रदर्स हॉकी अकादमी, रिजनल डेव्हलपमेंट सेंटर, मुंबई स्कूल स्पोर्ट्स संघटना संघांनी दणदणीत विजय मिळविले. दुसऱ्या दिवशी पाच सामन्यात 50 गोलची नोंद झाली.
ड गटात पहिला सामना खेळणाऱ्या एसएनबीपी संघाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत मोठा विजय मिळविला. आकाश पटेल, शुभम राजभार, कुंदन रौथ आणि विष्णू कोळी यांनी प्रत्येकी दोन, तर कुमार पटेलने एक गोल केला.
अ गटात ध्यानचंद अकादमी संघाने कल्लू अलीच्या चार गोलच्या जोरावर रायन इन्स्टिट्यूट संघावर 18-0 अशी मात केली. अमित बाबाने दुसऱ्या मिनिटाला खाते उघडल्यावर सुरु झालेला त्यांचा गोलधडाका अखेरपर्यंत कायम होता. मिथलेश यादव, जितीनने दोन, तर करणधार तुषा शर्माने तीन गोल केले. अब्दुल कादीर, रितेश पांडे यांनीही प्रत्येकी दोन गोलचे योगदान दिली. अभिषेक कुजुर आणि अवनीश पटेलने एक गोल केला.
एफ गटातील सामन्यात फ्लिकर्स ब्रदर्स अकादमीने केशव, देव गुप्ता आणि सौरवच्या प्रत्येकी दोन गोलच्या जोरावर ग्रासरुट हॉकी संघाचा 11-0 असा पराभव केला. कमलतप्रीत सिंग, नितीन, साहिल कुमार, मनिष, संजोत सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला.
(SNBP Hockey Tornament Host Win 10-0)