भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी संघाशी संबंधित एक धक्कादायक खुलासा केला आहे. संघाची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा हीला संघात ‘बेन स्टोक्स’ का म्हटले जाते, हे त्यांनी सांगितले. याबाबत अमूल मजुमदार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, दीप्ती चेंडू खूप वेगाने फेकते आणि म्हणूनच तो तिला बेन स्टोक्स म्हणतो.
नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाने चांगली कामगिरी केली. दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव 104.3 षटकांत 428 धावांवर आटोपला, प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 35.3 षटकांत 136 धावांवर सर्वबाद झाला. 292 धावांची आघाडी असतानाही भारतीय संघाने फॉलोऑन न करता 186 धावांवर आपला दुसरा डाव घोषित करून मोठे लक्ष्य ठेवले. दीप्ती शर्मा (Deepti Sharma) हीने अतिशय चांगली कामगिरी करत पहिल्या डावात ६७ धावा केल्या आणि गोलंदाजीतही तिने 5 विकेट्स घेतल्या.
अमोल मजुमदार (Amol Majumdar) यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय संघात ते दीप्ती शर्माला बेन स्टोक्स (Ben Stokes) म्हणतात, कारण तिचा थ्रो सर्वात वेगवान आहे. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते म्हणाले, “जेव्हा आम्ही क्षेत्ररक्षणाचा सराव करतो तेव्हा दीप्ती शर्माचा थ्रो खूप वेगाने येतो. जेव्हा ती थ्रो फेकते तेव्हा आपल्याला आपले डोळे खूप धारदार ठेवावे लागतात. मी तिला गंमतीने संघाचा बेन स्टोक्स म्हणतो. ही गोष्ट मी महिला क्रिकेटमध्ये पाहिली नाही.”
टी20 मालिकेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता पण संघाने कसोटी सामन्यात खूप चांगली कामगिरी केली आणि त्यात सर्व खेळाडूंचे उत्कृष्ट योगदान राहिले. (so we call her Ben Stokes coach big reveal about this Indian women player)
हेही वाचा
पाचव्या टेनिस प्रीमियर लीग स्पर्धेत बेंगळुरू एसजी माव्हरिक्स गुणतक्त्यात अव्वल स्थानी
हार्दिकच्या ‘या’ अटीपुढे मुंबई इंडियन्सने टेकले गुडघे, मजबुरीने करावा लागला रोहितचा पत्ता कट; जाणून घ्याच