पुणे: ई2डी स्पोर्ट्स यांच्या तर्फे ई2डी कॉर्पोरेट क्रिकेट लीग स्पर्धेत साखळी फेरीत सॉफ्टहार्ड ऑटोमेशन, रिग्रीन एन्टरप्राईज या संघांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून आगेकूच केली.
लवळे येथील ई2डी क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात श्रीकांत कासार(3-10)याने केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने पिल्सनर्सचा 9गडी राखून पराभव केला. सॉफ्टहार्ड ऑटोमेशनच्या श्रीकांत कासार (3-10), ऋषी राऊत (2-5), वैभव आगरकर (1-8), प्रफुल्ल मानकर (1-2), स्वप्नील चिखले (1-17)यांनी केलेल्या गोलंदाजीपुढे पिल्सनर्स संघाचा डाव 13.1 षटकात 64धावांवर संपुष्टात आला. यात आतिश कुंभार 20, स्वप्नील कुलकर्णी 16, रोहित जना 13यांनी थोडासा प्रतिकार केला. हे आव्हान सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने 7.3षटकात 1बाद 65धावा करून पूर्ण केले. यात विराज 31, कुमार ठक्कर 18 यांनी धावा काढून संघाला विजय मिळवून दिला.सामन्याचा मानकरी श्रीकांत कासार ठरला.
दुसऱ्या सामन्यात सुरज शिंदे याने 92धावांच्या खेळीच्या जोरावर रिग्रीन एन्टरप्राईज संघाने एलेनो एनर्जीचा 7गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना हर्षल राजपूत नाबाद 61, योगेश मोहिते 19, जिनेंद्र गायकवाड 17यांनी केलेल्या धावांच्या जोरावर एलेनो एनर्जी संघाने 20षटकात 6बाद 122धावा केल्या. याच्या उत्तरात रिग्रीन एन्टरप्राईज संघाने10.5षटकात 3बाद 126धावा करून हे आव्हान पूर्ण केले. सुरज शिंदेने सुरेख फलंदाजी करत 40चेंडूत 6चौकार व 10षटकारांच्या मदतीने 92धावांची खेळी करत संघाचा विजय सुकर केला. सामन्याचा मानकरी सुरज शिंदे ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
पिल्सनर्स: 13.1षटकात सर्वबाद 64धावा(आतिश कुंभार 20(16), स्वप्नील कुलकर्णी 16(12), रोहित जना 13(19), श्रीकांत कासार 3-10, ऋषी राऊत 2-5, वैभव आगरकर 1-8, प्रफुल्ल मानकर 1-2, स्वप्नील चिखले 1-17)पराभूत वि.सॉफ्टहार्ड ऑटोमेशन: 7.3षटकात 1बाद 65धावा(विराज 31(26), 4×4,1×6), कुमार ठक्कर 18(14), स्वप्नील कुलकर्णी 1-14);सामनावीर-श्रीकांत कासार;
एलेनो एनर्जी: 20षटकात 6बाद 122धावा(हर्षल राजपूत नाबाद 61(59,4×4,3×6), योगेश मोहिते 19(20), जिनेंद्र गायकवाड 17(22), शैलेंद्र कसबे 2-7, शरद शिंदे 2-30) पराभूत वि.रिग्रीन एन्टरप्राईज: 10.5षटकात 3बाद 126धावा(सुरज शिंदे 92(40, 6×4,10×6), निनाद कुलकर्णी 17(19), रोहन राऊत 1-8, प्रवीण पाटील 1-21, हनुमंत गाडे 1-32);सामनावीर-सुरज शिंदे.