---Advertisement---

जेव्हा साराने जड्डूला पाठवले होते भरपूर मैसेज; सोशलच्या पिचवर क्रिकेटपटूंमध्ये झालेली रोचक संभाषणे, टाका नजर

---Advertisement---

सध्याच्या युगात सोशल मीडियाची कोणत्याही क्रिकेटपटूच्या कारकीर्दीला आकार देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका असते. खेळाडूचे ब्रँड मूल्य आणि लोकप्रियता त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरील फॉलोअर्सच्या संख्येद्वारे मोजली जाते. जवळजवळ सर्व क्रिकेटपटू त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटचा वापर जाहिरात व चाहत्यांशी संपर्क साधण्यासाठी करतात. तथापि काहीवेळा असेही घडले आहे, की जेव्हा ट्विटरवरील त्यांच्या विचित्र संवादामुळे खेळाडू मोठ्या चर्चेत किंवा वादात पडले आहेत. अशाच काही प्रसंगांचा आम्ही येथे आढावा घेतला आहे.

रवींद्र जडेजा आणि सारा टेलर यांच्यातील रोचक संभाषण
ही घटना 2014 सालची आहे. त्यावेळी इंग्लडच्या महिला संघातील प्रमुख खेळाडू असलेल्या सारा टेलरने जडेजाबद्दल एकामागून एक असे 12 ट्वीट केले होते. रवींद्र जडेजाने ट्वीटरवर इंग्लंडची यष्टिरक्षक फलंदाज असलेल्या सारा टेलरला फॉलो केले नव्हते. म्हणूनच साराने काही मजेशीर ट्विट केले होते. मात्र जडेजाने साराच्या कोणत्याही ट्विटला उत्तर दिले नव्हते.

जेव्हा पाकिस्तानी अभिनेत्रीने विचारले- तुम्ही माझ्या मुलांचे वडील व्हाल का?
पाकिस्तानी अभिनेत्री सेहेर शिंवरीने ट्वीट करत न्यूझीलंडचा खेळाडू जिमी नीशमला विचारले होते की, ‘तुला माझ्या मुलांचे वडील व्हायला आवडेल काय?’ तसेच तिने वाक्याच्या पुढे मजेशीर इमोजीस देखील जोडले होते.

यावर नीशमने देखील उत्तर दिले होते की, ‘मला खरोखर वाटते की या इमोजीची काही गरज नाही.’

वीरेंद्र सेहवाग आणि रॉस टेलर
जेव्हा जेव्हा परदेशी खेळाडू भारतात येतात किंवा भारतीय संघाविरुद्ध मालिका खेळतात तेव्हा ते सोशल मीडियावर बऱ्याचदा हिंदीमध्ये ट्विट करत असतात. 2017 मध्ये असाच काहीसा प्रसंग घडला. जेव्हा न्युझीलंडचा संघ भारतात आला, तेव्हा रॉस टेलरने हिंदीमध्ये वीरेंद्र सेहवागच्या ट्विटला उत्तरे दिले होते. सुरुवातीला सेहवागने रॉस टेलरला ‘शिंपी’ म्हणून चिडवले होते. त्यानंतर टेलरने देखील हिंदीत मजेशीर ट्विट केले होते.

https://twitter.com/virendersehwag/status/922362712121683970?s=20

यासोबतच टेलरने एका कपड्याच्या दुकानाबाहेरचा फोटो शेयर करत लिहिले होते की- ‘वीरेंद्र सेहवाग राजकोटमध्ये सामन्यानंतर शिंपीचे दुकान बंद झाले, पुढचे शिवणकाम त्रिवेंद्रममध्ये असेल, नक्कीच या.’ टेलरच्या हिंदी मधील ट्विट नंतर वीरेंद्र सेहवागने देखील टेलरच्या हिंदीचे कौतुक केले होते व त्याला शुभेच्छा दिल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या-

दोन दिवसांपूर्वीच कोरोनामुळे आईचे निधन झालेल्या क्रिकेटरचे देशहिताला प्राधान्य, भारतीय कँपमध्ये झाली सामील

टीम इंडिया पुढच्या वर्षी खेळणार पाकिस्तानात क्रिकेट? ‘या’ कारणामुळे करावा लागू शकतो दौरा

चाहत्यांच्या मागणीवर डेव्हिड वॉर्नरने पुन्हा शेअर केला एक मजेशीर व्हिडिओ, घेतले साऊथ सुपरस्टार धनुषच रुप

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---