भारतीय महिला क्रिकेट संघाची युवा यष्टीरक्षक प्रिया पुनिया हीच्या आईचे सोमवारी कोरोनामुळे निधन झाले. त्याच वेळी इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात तिचा समावेश झाला आहे. दुःखात असणारी प्रिया या दौऱ्यासाठी भारतीय संघात सामील होणार का? याविषयी तर्कवितर्क लावले जात असतानाच, तिने भारतीय संघात सामील होण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे तिला भारतीय दिग्गज खेळाडूंना प्रेरणा मिळाल्याचे तिच्या वडिलांनी स्पष्ट केले.
या खेळाडूमुळे मिळाली प्रेरणा
प्रियाच्या आई सरोज यांचे सोमवारी कोरोनामुळे निधन झाले होते. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघासोबत ती मुंबईतील बायो-बबलमध्ये सहभागी होणार का याविषयी साशंकता होती. मात्र, प्रियाने देशहिताला प्राधान्य देत संघासोबत जोडण्याचा निर्णय घेतला. याविषयी सांगताना तिचे वडील सुरेंद्र पुनिया म्हणाले, “प्रियाच्या आईने हे जग सोडण्यापूर्वी प्रियाला व्हाट्सअप वरून संदेश पाठवला होता की, तू इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात सामील हो. आईच्या निधनानंतर ती काहीशी कोसळली. मी तिला समजावले की विराट कोहली आपल्या वडिलांच्या निधनानंतर दुसऱ्या दिवशी रणजी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. आयुष्यात असा कठीण काळ नेहमी येत असतो. त्यामध्ये आपल्याला खंबीर राहावे लागते. माझ्या बोलण्याचा तिच्यावर परिणाम झाला वतीने आपण मुंबईला जात असल्याचे सांगितले.”
याचसोबत प्रियाने आपल्या आईच्या आठवणींना उजाळा देत सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये तिने आपले व आईचे नाते स्पष्ट केले. तसेच, सर्वांना कोरोनाच्या काळात खबरदारी घेण्याचे आवाहन देखील केले. भारतीय महिला संघ इंग्लंडविरुद्ध १ कसोटी, ३ वनडे व ३ टी२० सामने खेळेल.
अशी आहे प्रियाची कारकीर्द
भारतीय महिला संघातील सर्वात सुंदर क्रिकेटपटू मानली जाणारी प्रिया देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व करते. यष्टीरक्षक असलेल्या प्रियाने आत्तापर्यंत भारतासाठी ७ वनडे व ३ टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये तिने अनुक्रमे २२५ व ९ धावा बनविल्या आहेत. तिने वुमन्स टी२० चॅलेंजमध्ये देखील सहभाग घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडिया पुढच्या वर्षी खेळणार पाकिस्तानात क्रिकेट? या कारणामुळे करावा लागू शकतो दौरा






