---Advertisement---

चाहत्यांच्या मागणीवर डेव्हिड वॉर्नरने पुन्हा शेअर केला एक मजेशीर व्हिडिओ, घेतले साऊथ सुपरस्टार धनुषच रुप

---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू डेव्हिड वॉर्नर आपल्या सोशल मीडिया वरील विविध व्हिडिओद्वारे नेहमीच चर्चेत असतो. सुरुवातीला वॉर्नरने टिक टॉक वरील आपल्या व्हिडिओने सर्वांचे मनोरंजन केले होते. मागील काही काळापासून वॉर्नर आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून वेगवेगळे व्हिडिओ शेअर करत होता. या मध्ये तो हॉलीवूड तसेच बॉलीवूड मधील वेगवेगळ्या चित्रपटांतील नायकांच्या व्हिडिओला आपला चेहरा लावून मनोरंजक व्हिडिओ बनवत होता. वॉर्नरच्या या व्हिडिओंना चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असे. मात्र मागील काही काळापासून वॉर्नरने व्हिडिओ बनवणे बंद केले होते. मात्र आता पुन्हा चाहत्यांच्या आग्रहास्तव त्याने एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. वॉर्नरने साऊथ सुपरस्टार धनुष याच्या मारी 2 या अवतारातील आपला व्हिडिओ शेअर केला आहे.

वॉर्नरने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शन लिहिले,’चाहत्यांच्या आग्रहास्तव पुन्हा आलोय.’ या व्हिडिओमध्ये वॉर्नर मारी 2 या चित्रपटातील राउडी बेबी या गाण्यावर अभिनेत्री साई पल्लवी सोबत डान्स करत आहे. काही वेळातच वॉर्नरचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला गेला. चाहत्यांसाठी एक क्षण धनुष व वॉर्नर मधील फरक ओळखणे देखील अवघड होऊन बसले होते.

पाहा व्हिडिओ –

https://www.instagram.com/p/CPDPuXKlC27/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान वॉर्नरच्या मैदानावरील कामगिरीचा विचार केला असता त्याच्यासाठी आयपीएल 2021 स्पर्धा फारच निराशाजनक ठरली. आयपीएल इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणल्या जाणाऱ्या वॉर्नरला हैदराबाद संघाने कर्णधार पदावरून दूर केले. इतकेच नाही तर त्याचा अंतिम 11 मध्ये देखील समावेश करण्यात आला नाही. दरम्यान वॉर्नरच्या आयपीएल कामगिरीचा विचार केला असता, तो खऱ्या अर्थाने हैदराबाद संघाचा एक आधारस्तंभ म्हणून गणला जातो. 2014 पासून हैदराबादच्या संघाचा नियमित सदस्य असलेल्या वॉर्नरने आपल्या नेतृत्वात 2016 साली हैदराबाद संघाला विजेतेपद मिळवून दिले होते. हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शन पूर्वी हैदराबाद संघ त्याला आपल्या संघात ठेवतो अथवा तो लिलाव प्रक्रियेत सहभागी होतो.

महत्त्वाच्या बातम्या-

भारतीय संघात एन्ट्री करण्यापूर्वी हा खेळाडू झाला होता आयएएसची परीक्षा पास, पदार्पणाच्या सामन्यातच ठोकले होते अर्धशतक

भारतीय संघात एन्ट्री करण्यापूर्वी हा खेळाडू झाला होता आयएएसची परीक्षा पास, पदार्पणाच्या सामन्यातच ठोकले होते अर्धशतक

पृथ्वी शॉकडे या गोष्टीची कमी, पाकिस्तानच्या क्रिकेटरने लक्षात आणून दिली शॉची मोठी चूक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---