चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला काल 19 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड संघात खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानचा 60 धावांनी पराभव करून न्यूझीलंड ने विजय मिळवला. तत्पूर्वी या सामन्यादरम्यान फखर जमान दुखापत झाल्यामुळे स्पर्धेतून बाहेर झाला आहे.
आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याच्याजागी संघात इमाम उल हक च्या नावाची घोषणा केली आहे. इमाम पाकिस्तानचा पूर्व कर्णधार इंजमाम उल हक चा भाचा आहे.
फकर जमान न्यूझीलंड विरुद्ध खेळताना पहिल्या षटकारात दुखापती झाला. त्याला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली. तसेच तो फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता पण त्याने 41 चेंडूत 24 धावा केल्या नंतर तो बाद झाला.
इमाम उल हकच नाव बऱ्याच वादग्रस्त विधानांमध्ये आढळून आलं आहे. 2019 मध्ये त्याच्यावर मुलींसोबत अफेअर असण्याचे आरोप करण्यात आले होते. यादरम्यान त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची माफी मागितली होती .त्याच्यावर आरोप होता की त्याने मुलींसोबत धोकादडी केली आहे.
माजी मुख्य निवडकर्ता इंजमाम उल हकच्या भाच्याने म्हणजेच इमाम उल हकने काही महिन्यांपूर्वीच अस वक्तव्य केल होतं की, ज्याने पाकिस्तानच्या क्रिकेट मध्ये वाद निर्माण झाला होता. एका टीव्ही शोमध्ये तो म्हणाला होता की, पाकिस्तान संघामध्ये त्याच्याबरोबर चुकीचा व्यवहार करण्यात आला.
2017 मध्ये वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून इमाम उल हकने 72 वनडे सामने खेळले आहेत. त्या दरम्यान त्याने 48 च्या एव्हरेज ने 3138 धावा केल्या आहेत. तसेच त्याने ह्या फॉरमॅटमध्ये 9 शतक आणि 20 अर्धशतक ठोकली आहेत.
फखर जमान ने स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर भावुक पोस्ट केली आहे. तो म्हणाला, सगळ्यात मोठ्या जागेवर पाकिस्तानच प्रतिनिधित्व करणे या देशाच्या प्रत्येक खेळाडूचा सन्मान आणि स्वप्न आहे. मला अभिमानाने कितीतरी वेळा पाकिस्तानच प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. पण आता दुर्दैवाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधून बाहेर झालो आहे. पण निश्चित रूपाने देव सगळ्या योजना योग्य रीतीने आखतो. आता मी घरूनच माझ्या संघातल्या खेळाडूंचं समर्थन करेल. ही फक्त सुरुवात आहे. पुनरागमन नक्कीच मजबूत असेल.
हेही वाचा
रोहित शर्मा आणि भारतीय संघाचे भविष्य चॅम्पियन्स ट्रॉफीवर अवलंबून? माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य
शुबमन गिल भारताचा उपकर्णधार कसा झाला? रोहित शर्माने सांगितले मोठे कारण!
IND vs BAN; रोहित शर्माच्या चुकामुळे अक्षर पटेलच्या हॅट्ट्रिकची संधी हुकली!






