ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup)भारताची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडने भारताचा 10 विकेट्सने दारुण पराभव केला आणि भारताचा स्पर्धेतील प्रवास संपला. या सामन्यात भारताचे सलामीवीर केएल राहुल आणि रोहित शर्मा यांच्या फलंदाजीवर अनेकांनी प्रश्न निर्माण केला. काही दिग्गज क्रिकेटपटूंनी देखील त्या दोघांवर टीका केली. हे काय कमी असताना संघसहाकाऱ्याने देखील दोघांवर ताशेरे ओढले आहे.
भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन (R Ashwin) याने त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हटले, “कधी-कधी आम्ही पॉवरप्लेमध्येच सामने हरतो. आम्ही पॉवरप्लेच्या दरम्यान 30 धावा करतो, तर विरोधी संघ 60च्या आसपास धावा करतो. तेथेच सामना संपतो. काहींना हे आकडे माहित नसतील, मात्र सर्वाधिक सामन्यांचा निकाल पॉवरप्लेवरच अवलंबून असतो.”
14.66च्या सरासरीने केवळ 88 धावा
टी20 विश्वचषक 2022च्या 6 डावांमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma)-केएल राहुल (KL Rahul) या जोडीने 14.66च्या सरासरीने केवळ 88 धावा केल्या. रोहितने आठव्या टी20 विश्वचषकात 4, 53, 15, 2, 15 आणि 27 अशा धावा केल्या. राहुलने 4, 9, 9, 50, 51 आणि 5 अशा धावा केल्या. यावरून दिसते की दोघांनी एकदाची अर्धशतकी भागीदारी केली नाही. त्यामध्ये त्यांची सर्वोत्तम धावसंख्या 27 राहिली. या स्पर्धेत भारत पॉवरप्लेमध्ये 17 चौकार आणि 6 षटकारच खेचू शकला. या स्पर्धेत भारताने पॉवरप्लेमध्ये जी कामगिरी केली ती आतापर्यंतची सर्वाधिक वाईट कामगिरी ठरली.
केवळ युएईच्या पुढे राहिली इंडिया
विश्वचषक 2022च्या सामन्यांच्या पॉवरप्लेमध्ये पाहिले तर भारताचे प्रदर्शन युएईच्या तुलनेच चांगले राहिले. भारताने पॉवरप्लेमध्ये 100.5च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. दुसरीकडे युएईने 77.8च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. तसेच सर्वाधिक स्ट्राईक रेट इंग्लंडचा राहिला. त्यांनी 143.3च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.
टी20 विश्वचषकात रोहित-राहुल लवकर बाद झाल्याने संपूर्ण दबाव विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्यावर राहिला. पहिल्याच सामन्यात पाकिस्तानविरुद्ध ते दोघेही 4-4 धावांवर बाद झाले होते. ‘Sometimes we lose in the powerplay’, Said R Ashwin on his You Tube Channel
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वनडे सामन्यात 500 धावा करणारा जगातील पहिला संघ, तो देखील भारतीय
‘तो सर्वत्र आहे’, धोनीबद्दल विराट कोहलीने केलेल्या पोस्टने इंटरनेटवर एकच खळबळ; एकदा पाहाच