टी20 विश्वचषकात इंग्लंडच्या ऍलेक्स हेल्सने धमाकेदार प्रदर्शन केले. पुढच्या वर्षी होणाऱ्या विश्वचषकात खेळण्याबाबत त्याच्याशी चर्चा करण्यात आली, तेव्हा त्याने एकदिवसीय क्रिकेटवर सध्या लक्ष नसल्याचे सांगितले. तो सध्या क्रिकेटच्या सगळ्यात छोट्या फॉर्मॅटकडे लक्ष देत आहे. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत त्याने भारताविरुद्ध झालेल्या सामन्यात शतकी खेळी केली होती.
पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळबाबत ऍलेक्स हेल्स याला (Alex Hales) विचारल्या गेलेल्या प्रश्नावर तो म्हटला की, त्याला एकदिवसीय सामन्यात खेळायचे आहे ,पण सध्या त्याचे लक्ष क्रिकेटच्या सगळ्यात छोट्या फॉर्मॅटवर आहे. हेल्सने अमिरात टी10 लीगच्या द्वारे आयाजित केलेल्या एका चर्चासत्रात म्हणाला की,” मला नाही माहित, पण मला वाटत आहे की मी पुढे जाऊन इंग्लंड संघासाठी आणि फ्रेंचाईझी क्रिकेट खेळण्यावर लक्ष देणार आहे. मी एकदिवसीय सामन्यांविषयी जास्त विचार नाही केला.
फिरकीविरुद्ध सुधारणा केली
हेल्सच्या मते, आशिया आणि यूएईमध्ये खेळल्याने फिरकीविरुद्ध खेळण्यात सुधारणा झाली. त्याचबरोबर तो हेही म्हणाला की ,”उपमहाद्वीपीय खेळपट्ट्यांवर फिरकीला मदत मिळते. तुम्ही तुमची पद्धत निवडायला हवी, मला वाटते की एका फ्रेंचायझी क्रिकटरसाठी महत्वाच्या गोष्टीपैकी आहे, तुम्ही जेव्हा वर्षभर वेगवेगळ्या देशात आणि वेगवेगळ्या परिस्थितीत स्पर्धेत खेळत असताे, तेव्हा आपण आपल्या खेळातील काही बाजूंमध्ये सुधारणा करत असतो ”
कसोटी क्रिकेेट सोडल्याने टी20 मिळाला फायदा
या स्पर्धेत अबू धाबी संघ आपल्या अभियानाची सुरुवात डेक्कन ग्लॅडिएटर्स विरुद्ध करणार आहे. हेल्स म्हटला की कसोटी क्रिकेट सोडण्याचा त्याला फायदा झाला. तो म्हणाला की,”मला वाटते की एकाच वेळी तिनही फॉर्मॅटमध्ये खेळणे खूप अवघड असते, काही खेळाडू आहेत ज्यांनी तिनही फॉर्मॅटमध्ये प्रावीण्य मिळवले. मी 2018 मध्येच कसोटी क्रिकेट खेळणे सोडले, त्यामुळे मला टी20 क्रिकेट या प्रकारात सुधारणा करण्यात मदत झाली.”
भारत आणि इंग्लंडमध्ये टी20 विश्वचषकात खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऍलेक्स हेल्सने झंझावती शतक ठोकले होते. त्याच्य या खेळीमुळे भारताचा 10 गडी राखून दारुण पराभव झाला.(Alex Hales told that he bacame successfull in T20 cricket because I left test cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सूर्यकुमार बनू शकतो सर्वाधिक टी-20 धावा करणारा फलंदाज, पण करावी लागणार ख्रिस गेलासारखी खेळी
सूर्याने विरोधी संघाच्या कर्णधारालाही पाडली भुरळ! सामना संपल्यानंतर विलियम्सन म्हणाला…