नोव्हेंबर 2020 मध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा सलामीवीर रोहित शर्माची तिनही प्रकारच्या क्रिकेट संघात झाली नव्हती. आयपीएल 2020 मध्ये किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध खेळताना हॅमस्ट्रिंगच्या दुखण्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले होते.त्यानंतर तो मुंबई इंडियन्सकडून खेळला नाही. त्याच्या दुखापतीबद्दल भारतीय संघांचे प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी रोहितच्या दुखापतीबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शास्त्री यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील आठवणींना देखील उजाळा दिला आहे.
दुखापत होणे ही बाब निराशाजनक – रवि शास्त्री
टाईम्स नाउ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रवि शास्त्री यांनी सांगितले की “एखाद्या खेळाडूसाठी दुखापत होणे म्हणजे सर्वात मोठी निराशाजनक बाब आहे. आपण त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करत असतो. लवकरात लवकर त्यातून सावरण्याचा आपण प्रयत्न करतो. अडचणींचा सामना करून आपल्याला खेळायचे असते, परंतु आपण 100% तंदुरुस्त आहात की नाही हे केवळ आपल्यालाच माहित असते.”
….तर भारतीय संघासाठी 5 वर्षे पुन्हा खेळलो असतो
पुढे बोलताना ते म्हणाले, “मी स्वत: एक क्रिकेटपटू आहे.1991 मधील ऑस्ट्रेलिया दौरा माझ्या कारकिर्दीतील शेवटचा दौरा होता.मी त्या दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला असता तर बर झालं असतं. कारण मी तंदुरुस्त नव्हतो. मी 3-4 महिन्यांची विश्रांती घेतली असती तर भारतीय संघासाठी कदाचित 5 वर्षे पुन्हा खेळू शकलो असतो. म्हणूनच मी अनुभवातून बोलत आहे. रोहितचं प्रकरण यासारखच आहे. रोहित शर्मा हा एक महत्त्वाचा खेळाडू आहे आणि पूर्णपणे तंदुरुस्त न होता त्यान दौर्यावर जाऊ नये.”
रोहित दुखापतीतून झाला बरा-पोलार्ड
दुसरीकडे, मुंबई इंडियन्सचा कार्यवाहक कर्णधार कायरान पोलार्डने शनिवारी सांगितले की, संघाचा कर्णधार रोहित शर्मा हार्मस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरला आहे. तो लवकरच संघात परत येईल.दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या सामन्यानंतर पोलार्डने सांगितले की “रोहितची प्रकृती ठीक आहे आणि तो लवकरच परत येईल याची आशा आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
‘जर पृथ्वी शॉ पुढील सेहवाग असेल तर मी रघुराम राजन’, खराब कामगिरीमुळे चाहत्यांनी उडवली खिल्ली
कोहली की पडीक्कल? कुणाची विकेट होती खास? संदीप शर्माने दिले ‘हे’ उत्तर
आयपीएलमध्ये विराट कोहलीला ‘हा’ युवा गोलंदाज कायमच नडतो, सर्वाधिक वेळा केलंय बाद
ट्रेंडिंग लेख –
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
ऑस्ट्रेलिया आख्ख्या जगाला नडायचे आणि ऑस्ट्रेलियाला नडायचा एकटा व्हीव्हीएस लक्ष्मण
IPL 2020: प्रतिभाशाली असूनही पंजाब संघाकडून एकाही सामन्यात संधी न मिळालेले ५ युवा क्रिकेटर्स