---Advertisement---

जिगरबाज ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरच्या धैर्याला सलाम! तोंडातून रक्त येऊनही परतली मैदानात, पाहा व्हिडिओ

---Advertisement---

भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्यात रविवारी (२६ सप्टेंबर) खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान मैदानावर एक वेदनादायक घटना घडली. ऑस्ट्रेलियन महिला खेळाडू सोफी मॉलिनेक्सच्या तोंडाला चेंडू लागल्यानंतर ती रक्ताच्या उलट्या करताना दिसली. सोफीसोबतची ही हृदयद्रावक घटना भारतीय संघाच्या फलंदाजीदरम्यान घडली.

भारतीय फलंदाजीदरम्यान ३९ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर दीप्ती शर्माने सदरलँडच्या शॉर्ट बॉलवर पूल करण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटच्या वरच्या बाजूला लागला आणि चेंडू फाईन लेगच्या दिशेने गेला. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना स्टेला कॅम्पबेलने चेंडू जोरात फेकला, चेंडू उसळला आणि चेंडू थांबवण्याचा प्रयत्न करत असताना सोफी मॉलिनेक्सच्या तोंडाला लागला. त्यामुळे ती जखमी झाली.

चेंडू सोफी मोलिनेक्सच्या तोंडावर लागताच, सहकारी खेळाडू तिच्याजवळ जमले. या दरम्यान, सोफी मॉलिनेक्स खूप अस्वस्थ दिसत होती आणि तिच्या तोंडातून रक्त बाहेर पडताना दिसत होते. त्यानंतर त्यांनी तिला मैदानाबाहेर नेले. मात्र, काही वेळानंतर ती ओठांवर सीलबंद पट्टी बांधून पुन्हा मैदानावर परतली. तिच्या या धैर्याला क्रिकेट चाहत्यांनी सलाम केला आहे.

दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना यजमान संघाने निर्धारित ५० षटकांत ९ गडी गमावून २६४ धावा केल्या होत्या. भारतीय संघासाठी झुलन गोस्वामीने १० षटकांत ३७ धावा देऊन ३ गडी बाद केले. भारतीय संघाने हा सामना २ गडी राखून जिंकला. ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची मालिका या २-१ ने जिंकली आहे. पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी हाहाकिरी केल्याने भारतीय संघ पराभूत झाला होता. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार पुनरागमन केले होते. सामना जवळजवळ जिंकला होता, पण शेवटच्या षटकातील झुलन गोस्वामीचा नो बोल महागात पडला आणि ऑस्ट्रेलियन महिला संघाने रोमहर्षक विजय मिळवला.

मात्र, तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाला पराभव पत्करावा लागला असून त्यांचा एकदिवसीय क्रिकेटमधील सलग तिसरा विजय भारतीय संघाने रोखला आहे. ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने सलग २४ विजय नोंदवले होते. गेल्या ४ वर्षांपासून हा संघ अजिंक्य होता.

महत्त्वाच्या बातम्या-
-भावनेच्या भरात वाहून गेला व्यंकटेश अय्यर; आऊट झाल्यानंतरही लावली डीआरएसची वाट
-CSKvsKKR: जडेजाच्या धुव्वादार खेळीने केकेआरच्या तोंडून हिसकावला सामना, सीएसकेचा २ विकेट्सने विजय
-शमीच्या तेज तर्रार चेंडूने अलगद उडवले केनचे स्टंप्स, व्हिडिओ बघून म्हणाल, नुसता धुरळा…!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---