आयपीएल २०२२ मध्ये सनरायजर्स हैदराबादकडून खेळत असताना उमरान मलिकने सर्वांना प्रभावित केले आहे. याचे फळ म्हणून मलिकला लगेचच मिळले. आगामी दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यासाठी त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. आता मात्र उमरान मलिकच्या भविष्याबद्दल खुद्द बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याने खुलासा केला आहे. गांगुलीने बोलताना उमरान मलिकचे कौतुक केले, सोबतच उमरानला एक मोलाचा सल्ला देखील दिला.
“उमरान मलिकचे भवितव्य त्याच्या हातात आहे. जर तो तंदुरुस्त राहिला, सध्या तो ज्या वेगाने गोलंदाजी करत आहे आणि तो टिकवून ठेवू शकला, तर मला खात्री आहे की तो भारतीय क्रिकेट संघासाठी दीर्घकाळ खेळू शकेल.” अशी आशा यावेळी बोलताना सौरव गांगुली याने व्यक्त केली.
“या हंगामात अनेक तरुण प्रतिभांनी त्यांच्या प्रतिभेचे चमकदार प्रदर्शन केले आहे. तिलक वर्मानी मुंबई इंडियन्ससाठी चांगली फलंदाजी केली, तर राहुल त्रिपाठी आणि राहुल तेवतिया यांनी अनुक्रमे सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्ससाठी चांगली फलंदाजी केली. या हंगामात भारताला उमरान मलिक, मोहसीन खान, अर्शदीप सिंग, आवेश खान असे अनेक उदयोन्मुख वेगवान गोलंदाज मिळाले. आयपीएल ही एक अशी जागा आहे जिथे प्रतिभेला संधी मिळते,” असे म्हणत गांगुलीने सर्व युवा खेळाडूंचे अभिनंदन केले.
दरम्यान, उमरान मलिकने आयपीएल २०२२ मध्ये हैदराबादसाठी शानदार गोलंदाजी केली. त्याने १४ सामन्यात २२ विकेट घेतल्या. जम्मू आणि काश्मीरच्या युवा वेगवान गोलंदाजाने १३.४० च्या स्ट्राइक रेटने ९.०३ च्या इकॉनॉमीने धावा देत विकेट्स घेतल्या आहेत.
नवनवीन अपडेट्स व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा
‘चूका कर आणि लोकांसमोर अपयशी हो’, अश्विनला भारताच्या माजी प्रशिक्षकाने दिलेला अनोखा गुरूमंत्र
संजू सॅमसनला बेंगलोरच्या ‘या’ दोन गोलंदाजांपासून राहावं लागेल सावध, बनू शकतात राजस्थानचा काळ
मैदानात घुसलेल्या चाहत्याला पोलिसांनी थेट उचललं खांद्यावर, विराटही झाला चकीत; Video व्हायरल